बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात त्याने १२० कोटींची कमाई केली होती. सध्या संपूर्ण भारतात ‘पठाण’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नवनवे विक्रम रचत असताना दुसरीकडे शाहरुखचा मुलगा अबरामने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
नुकतंच शाहरुखने Ask SRK हे सेशन घेतले. त्यावेळी त्याला त्याच्या चाहत्याने विविध प्रश्न विचारले. त्या सर्वांची त्याने हटके शब्दात प्रतिक्रिया दिली. यावेळी शाहरुखला पठाण पाहिल्यानंतर अबरामची प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने प्रेक्षकांची मनं जिंकली.
आणखी वाचा : ‘पठाण’चे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन पाहिल्यावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
शाहरुखला चाहत्याने विचारलेल्या त्या प्रश्नावर तो म्हणाला, “मला नाही माहिती कसं पण तो मला म्हणाला, बाबा हे कर्म आहे आणि मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.” दरम्यान याच सेशनमध्ये शाहरुखला बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल काय वाटते असं विचारण्यात आले. त्यावर त्याने “भावा, नंबर हे फोनचे असतात. आम्ही तर त्याचा आनंद वाटून घेतो”, असे शाहरुख म्हणाला. शाहरुखने दिलेल्या या उत्तराने सर्वांचेच मन जिंकून घेतले.
आणखी वाचा : “आम्हाला आमच्या कामाचे पैसे का मागावे लागतात…” मालिका विश्वाबद्दल सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या
दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मुख्य भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतला. पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे.