scorecardresearch

‘पठाण’चे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन पाहिल्यावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

‘पठाण’चे कलेक्शन पाहिल्यावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

pathaan shahrukh khan reaction
शाहरुख खान पठाण कलेक्शन

Pathan Box Office Collection : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खान हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता या चित्रपटाच्या कमाईबद्दल अभिनेता शाहरुख खानने वक्तव्य केले आहे.

बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. यानुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने १२७.५० कोटींची कमाई केली. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही ‘पठाण’ची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दाक्षिणात्य चित्रपटांच्या ‘या’ यादीत झाला समावेश 

तर विश्लेषक रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार ‘पठाण’ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी देशभरात ३४ ते ३६ कोटी रुपये कमाई केली आहे. त्याबरोबर जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

नुकतंच शाहरुखने Ask SRK हे सेशन घेतले. त्यावेळी एका चाहत्याने त्याला या कलेक्शनबद्दल काय वाटते असं विचारलं. त्यावर शाहरुखने उत्तर दिले. “भावा, नंबर हे फोनचे असतात. आम्ही तर त्याचा आनंद वाटून घेतो”, असे शाहरुख म्हणाला. शाहरुखने दिलेल्या या उत्तराने सर्वांचेच मन जिंकून घेतले.

आणखी वाचा : Pathan Box Office Collection : ‘पठाण’ चित्रपटाने मोडला ‘KGF 2’ चा रेकॉर्ड, तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

दरम्यान येत्या विकेण्डचा पठाणला मोठा फायदा होईल, असं म्हटलं जात आहे. करोना काळानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्यामुळे आता ‘पठाण’च्या कमाईमध्ये किती वाढ होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 16:44 IST