बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा आज वाढदिवस आहे. करिअरच्या सुरुवातीला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलेल्या शाहिदने बॉलिवूड अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. ‘हैदर’, ‘जब वी मेट’, ‘विवाह’, ‘उडता पंजाब’, ‘कमीने’, ‘कबीर सिंग’ अशा हिट चित्रपटातून शाहिदने अभिनायाचा ठसा उमटवला. बॉलिवूडमधील अभिनय कारकिर्दीत त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. करीना कपूर व प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींबरोबर शाहिदच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहिदने करीना व प्रियांकाबद्दलच्या अफेअरबाबत एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं होतं. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये शाहिद कपूरने हजेरी लावली होती. या शोच्या सहाव्या सीझनमध्ये शाहिद इशान खट्टरसह सहभागी झाला होता. या शोमध्ये रॅपिड फायर खेळात करण जोहरने शाहिदला त्याच्या एक्स गर्लफ्रेंड करीना व प्रियांकाबद्दल प्रश्न विचारला होता. “प्रियांका व करीना या तुझ्या एक्स गर्लफ्रेंडपैकी कोणा एकाबरोबरच्या आठवणी पुसून टाकण्याची पावर तुला मिळाली, तर तू कोणाबरोबरच्या आठवणी डिलीट करशील?”, असं करणने शाहिदला विचारलं होतं.

हेही वाचा>> “मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती, पण… ” मराठी अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

हेही वाचा>>Video: “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “त्याच्या डोक्यावर केस…”

करण जोहरच्या या प्रश्नावर शाहिद उत्तर देत म्हणाला, “करीनाबरोबर माझं रिलेशनशिप खूप काळ होतं. पण प्रियांका आणि मी थोड्या वेळासाठी रिलेशनशिपमध्ये होतो. त्यांच्याबरोबर मी जो काळ घालवला त्यातून मी खूप काही शिकलो आहे. त्यामुळे मला या आठवणी डिलीट कराव्याशा वाटत नाहीत”. शाहिद कपूरने केलेलं हे वक्तव्य चर्चेत आलं होतं.

हेही वाचा>> Video: “८० हजारांचे शूज” व्हिडीओतील ‘त्या’ कृतीमुळे एमसी स्टॅन ट्रोल, नेटकरी म्हणाले “छपरी…”

शाहिदने ‘फर्जी’ वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. शाहिदने ७ जुलै २००५ रोजी मीरा राजपूतशी लग्नगाठ बांधली. त्यांना मिशा कपूर ही मुलगी व झेन हा मुलगा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor birthday when actor talk about ex gf priyanka chopra and kareena kapoor in coffee with karan kak