प्रत्येक व्यक्ती प्रेमात पडते. प्रेमात पडल्यावर सर्व काही छान वाटतं. मात्र, हेच प्रेम जेव्हा आपली साथ सोडतं तेव्हा काळीज पूर्णत: तुटतं. बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर लग्नाआधी बॉलीवूडची बेबो करीना कपूरच्या प्रेमात होता, अशी चर्चा होती. त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा झाल्या. त्यानंतरही शाहिदचं नाव सिनेविश्वातील काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं. मात्र, त्यानं मिरा राजपूतबरोबर विवाह करून, अफेअरबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. अशात आता शाहिदने ब्रेकअप या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज शमनीच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहिदने त्याच्या लग्नाआधीच्या नात्यांवर वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत त्याला जेव्हा प्रेमात हृदय तुटतं तेव्हा कसं वाटतं, असं विचारण्यात आलं होतं. त्यावर शाहिद म्हणाला, “जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं एखाद्यावर प्रेम करता आणि ती व्यक्ती अचानक तुमच्यापासून दूर जाते, तेव्हा स्वत:चा आत्मसन्मान गमावेपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहता. असे करताना तुम्हाला हेही लक्षात येत नाही की, यात तुम्ही तुमची प्रतिष्ठासुद्धा गमावत आहात. या सर्व गोष्टींची जाणीव फार उशिरा होते आणि तेव्हा तुम्ही विचार करता की, अरे, मी हे काय करत होतो.”

अशा घटनांमधून प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकत असतो. त्यामुळे शाहिदला मुलाखतीमध्ये तू यातून काय शिकलास, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शाहिद म्हणाला, “प्रेमात ब्रेकअपनंतर हृदय तुटल्यावर तुम्हाला हे समजतं की, तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला किती मर्यादेपर्यंत सहन करू शकता.”

शाहिद कपूर पुढे म्हणाला, “प्रेमात पडणं वाईट नाही. मात्र, यानं तुमच्या आयुष्यात किती चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतात याकडे तुम्ही स्वत: लक्ष दिलं पाहिजे. मी प्रेमातून असं शिकलो की, एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची गरज असू नये. कारण- मला त्या व्यक्तीची गरज आहे हे प्रेम मिळविण्याचं सर्वांत स्वार्थी कारण आहे.”

नात्यात दुरावा केव्हा येतो?

शाहिद कपूरने पुढे नात्यात दुरावा केव्हा येतो याचीही माहिती सांगितली आहे. तो म्हणाला, “रिलेशनशिपमध्ये असताना आपण एकमेकांच्या प्रेमात असतो. मात्र, काही काळानं पार्टनर तुम्हाला काही गोष्टी करण्यास सांगत आहे आणि तुम्ही त्या त्याच्या दबावाखाली करत आहात, अशा वेळी नात्यात दरी निर्माण होण्यास सुरुवात होते.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor said he lost dignity and self respect in his past relationship rsj