Premium

“मी त्यावेळी खूप…”, ‘अर्जुन रेड्डी’तील मारहाणीच्या सीनवर शालिनी पांडेने सहा वर्षांनी दिली प्रतिक्रिया

‘अर्जुन रेड्डी’ चित्रपट लिंगभेद करणारा असल्याची झाली होती टीका, शालिनी पांडे म्हणाली…

Shalini Pandey reacted on Arjun Reddy slap scene
शालिनी पांडे नेमकं काय म्हणाली? (फोटो – इन्स्टाग्राम व स्क्रीनशॉट)

२०१७ मध्ये आलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटात विजय देवरकोंडा व शालिनी पांडे मुख्य भूमिकेत होते. अवघे तीन कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट लिंगभेद करणारा असल्याच्या टीकेबद्दल अभिनेत्री शालिनी पांडेने प्रतिक्रिया दिली आहे. हा तिचा पहिला चित्रपट होता. शालिनी म्हणाली की तिने चित्रपट साइन केला तेव्हा ती खूप तरुण आणि भोळी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अर्जुन रेड्डी’वर प्रेमाच्या नावाखाली पुरुषत्व आणि वाइट वर्तणुकीचा प्रचार केल्याबद्दल टीका झाली होती. विजय देवरकोंडा याने अर्जुन हे पात्र साकारलं होतं, तर चित्रपटात त्याची गर्लफ्रेंड प्रीतीची भूमिका शालिनी पांडेने केली होती. यात एका सीनमध्ये अर्जुन प्रीतीला थप्पड मारतो, या सीनवर तर खूप टीका झाली होती. आता सहा वर्षांनंतर शालिनीने ‘न्यूज १८’ ला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाबद्दल भाष्य केलंय. “मी चित्रपट साइन केला त्यावेळी मी २१ वर्षांचे होते, मी खूप तरुण व भोळी होते. तेव्हा माझ्यासाठी चित्रपटात काम करणं हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं होतं… ते सगळं स्वप्नासारखं होतं. त्या क्षणी माझ्यासाठी दुसरं काहीही महत्त्वाचं नव्हतं.”

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

शालिनी पांडेने या चित्रपटाबद्दल तिचं मत व्यक्त करण्यास नकार दिला. तिच्यामते आता तिला या सिनेमाबद्दल बोलणं महत्त्वाचं वाटत नाही. तसेच तिने दावा केला की हा चित्रपट नेहमीच तिच्या हृदयाच्या जवळ असेल. “लोकांनी तो सीन कसा घेतला, यावर मला मत मांडायचं नाही. आपण सर्व दिवसेंदिवस विकसित होत आहोत. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते आणि चित्रपटाबद्दल त्यांना हवे तसे बोलण्याचा अधिकार आहे,” असं शालिनी म्हणाली.

“मीही व्हर्जिन नाही”, जेव्हा नेहा पेंडसेने ट्रोलर्सना दिलेलं सडेतोड उत्तर; दोन मुलींच्या वडिलाशी लग्न केल्याने झालेली ट्रोल

‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला होता. यात विजय देवरकोंडा व शालिनी पांडेसह राहुल रामकृष्ण, जिया शर्मा आणि कांचना यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचे नंतर रिमेकही बनले. हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’मध्ये शाहिद कपूर व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shalini pandey reacted on arjun reddy slap scene after 6 years hrc

First published on: 29-11-2023 at 17:09 IST
Next Story
‘A’ सर्टिफिकेट देऊनसुद्धा रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’वर चालली सेन्सॉरची कात्री; सुचवले ‘हे’ पाच बदल