‘द ग्रेट इंडियन कपिल शो'(The Great Indian Kapil Show)मध्ये नुकतीच संपूर्ण सिन्हा कुटुंबाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. शत्रुघ्न सिन्हा, त्यांची पत्नी पूनम सिन्हा, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अनेकविध गोष्टींवर गप्पा मारल्या आहेत. आता समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पूनम सिन्हा यांच्या आईने सुरुवातीला शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबर लग्न करण्यास परवानगी नाकारली होती. त्याबद्दल या जोडप्यानं खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शत्रुघ्न व पूनम सिन्हा यांच्या लग्नाला अभिनेत्रीच्या आईचा होता विरोध

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अर्चना पूरन सिंह विचारतात, “पूनम तुम्ही शत्रूजींना प्रपोज केलं की त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं?” त्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी लगेच उत्तर देत म्हटले, “त्यांनी माझ्याकडून प्रपोज करून घेतलं.” पूनम सिन्हा यांनी पुढे म्हटले, “यांचा मोठा भाऊ माझ्या आईशी बोलायला घरी आला होता. माझ्या आईने सांगितले की, आम्हाला फिल्म इंडस्ट्रीमधील मुलगा नको आहे.”

त्याबद्दल अधिक बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले, “यांच्या आईने म्हटले की, तू तुझ्या भावाला पाहिले आहेस का? हा बिहारी, गल्लीतील गुंड आणि आमची मुलगी दुधाने धुतलेली, इतकी सुंदर, गोरी व मिस इंडिया आहे. जर तू त्यांना एकत्र उभं केलंस आणि एक फोटो काढलास, तर तुला ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो दिसेल.”

सोनाक्षी व झहीर इक्बाल यांच्या लग्नामुळे सिन्हा कुटुंब मोठ्या चर्चेत आले होते. सोनाक्षी व झहीरच्या लग्नाला सिन्हा कुटुंबाकडून विरोध असल्याचे म्हटले जात होते. सोनाक्षीच्या भावांना तिचे हे लग्न मान्य नसल्याचे म्हटले जात होते. त्याबरोबरच त्यांच्या लग्नामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरदेखील मोठी टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सोनाक्षीने कोणताही गुन्हा केला नसल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केले होते.

हेही वाचा: अमेरिका सोडून माधुरी दीक्षित मायदेशी काय परतली? म्हणाली, “माझे आई-बाबा आणि दोन्ही मुलं…”

दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा कार्यक्रम नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये कलाकार मंडळी हजेरी लावताना दिसतात. चित्रपट तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल कलाकार व्यक्त होताना दिसतात. त्याबरोबरच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील कलाकार त्यांच्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यामुळे द ग्रेट इंडियन कपिल शो हा लोकप्रिय शोपैकी आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha reveals wife poonams mother was against their marriage the great indian kapil show nsp