बॉलिवूडच्या पार्ट्यांची चर्चा कायमच होत असते. कोणाचा वाढदिवस असो किंवा चित्रपटाची सक्सेस पार्टी असो, या पार्टीत येणारे कलाकार कायमच नेटकऱ्यांच्या रडारवर असतात. आता या पार्ट्यांमध्ये स्टार किड्सदेखील असतात. नुकतीच सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती पार्टीतून बाहेर येताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूडच्या पार्टीत करण जोहरच्या पार्टीची कायम चर्चा होताना दिसून येते. या पार्टीला अनेकांनी हजेरी लावली होती मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सीमा खानने, पार्टीतून बाहेर येत असताना तिला नीट चालता येत नव्हते. पापाराझीनी तिला फोटोसाठी विचारले असता तिला नीट उभे राहता येत नव्हते, एकीकडे ती फोनवर बोलताना दिसून येत आहे.

सावरकरांवरील बायोपिकसाठी रणदीप हुड्डाने केला ‘हा’ बदल; म्हणाला, “या भूमिकेसाठी…”

सीमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. एकाने लिहले आहे, ‘दारू इतकी प्यायली आहे की धड चालता ही येत नाहीये’, दुसऱ्याने लिहले आहे ‘फोन आला आहे तो उचला तरी उगाच पत्रकारांसमोर कशाला दिखावा करता’? तिसऱ्याने लिहले आहे ‘नशे सी चढ गयी’, तर चौथ्याने लिहले ‘जरा सा झूम लूम मैन’, अशाच शब्दात तिची खिल्ली उडवली जात आहे.

सीमा आणि सोहेलची भेटदेखील एका पार्टीत झाली होती. मजेशीर गोष्ट म्हणजे सीमाने घरातून पळून जाऊन सोहेलशी लग्न केले होते. सीमा फॅशन डिझायनिंग करते. सीमा खान’ नावाने तिची कपड्यांची दुकाने आहेत. निर्वाण आणि योहान अशी दोन मुले तिला आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sohail khan ex wife seema sajdeh gets trolle after coming back from karan johars party spg