scorecardresearch

सावरकरांवरील बायोपिकसाठी रणदीप हुड्डाने केला ‘हा’ बदल; म्हणाला, “या भूमिकेसाठी…”

शारीरिक बदलासाठी घेतलेला काळ मला फायद्याचा ठरतो

सावरकरांवरील बायोपिकसाठी रणदीप हुड्डाने केला ‘हा’ बदल; म्हणाला, “या भूमिकेसाठी…”
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेता रणदीप हुड्डा बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. गेले काही महिने त्याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट फारच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. या चित्रपटाच्या कामात काय प्रगती होत आहे हे वेळोवेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांशी शेअर केलं आहे. अभिनेत्याने नुकतंच एनएआयशी बोलताना यातील भूमिकेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

रणदीप म्हणाला, “माझे वजन खूप दिवसांपासून कमी आहे, मला हे मान्य आहे की माझे वजन जास्त काळ कमी नसावे मात्र विनायक दामोदर सावरकरांवरील बायोपिकसाठी हे अत्यावश्यक आहे आणि मी साकारत असलेल्या पात्राला न्याय देण्यासाठी मी स्वतःला कायम झोकून देतो. अशा प्रकारच्या बदलांमुळे शरीरावर परिणाम होतो. .म्हणून मी थोडावेळ यामधून ब्रेक घेतो अथवा काही काळ नवा चित्रपट करण्यासाठी थांबतो. शारीरिक बदलांसाठी घेतलेला काळ मला फायद्याचा ठरतो.” रणदीप या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. त्याने ‘सरबजीत’ चित्रपटासाठी मेहनत घेतली होती.
तो पुढे म्हणाला, “अशा प्रकारच्या बदलांमुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. म्हणून मी थोडावेळ विश्रांती घेतो अथवा काही काळ नवा चित्रपट करण्यासाठी थांबतो. शारीरिक बदलासाठी घेतलेला काळ मला फायद्याचा ठरतो.” रणदीप या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. त्याने ‘सरबजीत’ चित्रपटात त्याने स्वतःचे वजन कमी केले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची असून उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी हा चित्रपट लिहिला आहे. रणदीपच्या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २६ मे २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 19:10 IST

संबंधित बातम्या