लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांनी नुकतीच विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. चित्रपट पाहिल्यानंतर सुधा यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. इतकंच नाही तर आत्मविश्वास हीच एखाद्या व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं त्या म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्क्रिनिंगनंतर सुधा मूर्ती आपल्या चित्रपटाबद्दल बोलतानाचा व्हिडीओ विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला आहे. सुधा मूर्तींनी चित्रपटाला हृदयस्पर्शी म्हटलं. तसेच एका समजूतदार पुरुषामुळे स्त्रीला यशस्वी होणं कसं शक्य होतं याबद्दलही त्या बोलल्या. या चित्रपटात महिला शास्त्रज्ञांनी कोविड-१९ ची लस तयार करण्याचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत.

३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”

त्या म्हणाल्या, “मला स्त्रीची भूमिका समजते कारण ती एक आई आहे, ती एक पत्नी आहे आणि ती एक करिअर करू इच्छिणारी व्यक्ती आहे. आपले कुटुंब आणि आपले काम दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं खूप कठीण आहे. पण काही लोक भाग्यवान असतात. माझ्या बाबतीत, माझे आईवडील वरच्या मजल्यावर राहायचे आणि मी खाली राहायचे, त्यामुळे मी चांगलं काम करू शकले.” त्या पुढे म्हणाल्या, “मुलं झाल्यानंतर महिलांसाठी करिअर करणं सोपं नसतं. तिला कुटुंबाचा चांगला आधार लागतो. त्यामुळेच मी नेहमी म्हणते, ‘प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक समजूतदार पुरुष असतो, नाहीतर ती हे करू शकत नाही.'”

“ते मला रात्री घरी घ्यायला यायचे अन्…”, अमिताभ व जया बच्चन यांच्या डेटिंगच्या दिवसांबद्दल दिग्गज अभिनेत्रीने सांगितल्या आठवणी

“कोव्हॅक्सिन म्हणजे काय हे सामान्य माणसाला समजणार नाही… पण हा चित्रपट स्पष्ट प्रयत्न दाखवतो. ते फक्त काम नाही; या सर्व शास्त्रज्ञांनी केलेले निस्वार्थ कार्य आहे. त्यांनी या कालावधीत जास्तीत जास्त वेळ लस निर्मितीत घालवला जेणेकरून आपण सर्वजण आनंदाने आणि निरोगीपणे जगू शकू. हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे,” असं सुधा म्हणाल्या.

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

“आमच्याकडे प्रचंड क्षमता आहे, परंतु ती दिसून येत नाही कारण ‘आम्ही ते करू शकणार नाही’ अशी आम्हाला नेहमीच काळजी असते. पण आपण ते करू शकतो. हा संदेश चित्रपटात आहे. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर कोणत्याही क्षेत्रात आपण अशक्य गोष्टी करू शकतो. आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. सौंदर्य कपड्यांमध्ये किंवा मेकअपमध्ये नसते. तर ते आपल्यात असलेल्या धैर्य आणि आत्मविश्वासात आहे. आपला आत्मविश्वास हीच खरी संपत्ती असल्याचे हा चित्रपट सांगतो. त्यामुळे सर्व भारतीयांनो, तुमची क्षमता दाखवा. मेहनती व्हा आणि तुम्ही भारतीय आहात याचा अभिमान बाळगा,” असं सुधा म्हणाल्या. दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी सुधा मूर्ती यांचे प्रेरणादायी शब्दांबद्दल आभार मानले.

‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, रायमा सेन आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक अग्निहोत्री म्हणाले की हा चित्रपट इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) माजी महासंचालक बलराम भार्गव यांच्या “गोइंग व्हायरल: मेकिंग ऑफ कोवॅक्सिन” वर आधारित आहे. चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudha murty reviews vivek agnihotri the vaccine war movie hrc