बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) ही विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असते. आता कोणत्याही चित्रपटातील अभिनयामुळे नाही, तर सुकेश चंद्रशेखरने तिला व्हॅलेंटाइनला दिलेल्या गिफ्टमुळे ती चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांना आर्थिक फसवणूक केल्याने सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. मंडोली तुरुंगातून त्याने अभिनेत्रीसाठी गिफ्टची व्यवस्था करीत तिला पत्रही लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्यासाठी व्हॅलेंटाइन दिवस खास…

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पत्रात लिहिले, “हा व्हॅलेंटाइन दिवस खूप खास आहे. कारण-आपण एकत्र राहण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जगातील सर्वांत उत्तम व्हॅलेंटाइन आहेस. आपल्यासाठी व्हॅलेंटाइन दिवस खास आहे. कारण- आपल्या प्रेमाची सुरुवात याच दिवसापासून झाली होती. या दिवशी आपण एकमेकांना आहे तसे स्वीकारले. आपल्या आयुष्यातील ते सर्वांत सुंदर दिवस होते. हे व्हॅलेंटाइन आहे आणि मी तुला आश्चर्यचकित करणार नाही, असे होणार नाही. तुझी जी व्हॅलेंटाईनची जी भेट आहे, ती विशेषत: गल्फस्ट्रीममध्ये बनवलेले जेट आहे. ज्यावर तुझ्या नावाची जेएफ (JF) ही आद्याक्षरे आहेत.

सुकेशने या जेटचा नोंदणी क्रमांक हा जॅकलीनच्या वाढदिवसाची तारीख असल्याचा दावा केला. पुढे त्याने जॅकलीनला हे जेट खास तुझ्यासाठी बनवले असल्याचे म्हणत Gulfstreammiddleeast ला टॅग करीत हे जेट इतके खास बनविल्याबद्दल धन्यवाद म्हटले. पुढे जॅकलीनला संबोधत त्याने लिहिले की, तू तुझ्या शूटिंगसाठी जगभरात जात असतेस. आता या जेटमुळे तुझा प्रवास सुखकर होईल. या जेटचे टॅक्स भरणार असून, हे पू्र्णत: कायदेशीर आहे. याबरोबरच कोणत्याही कथित गुन्ह्यांमधील रकमेतून हे जेट खरेदी केलेले नाही.

दरम्यान, सुकेश चंद्रशेखरला २०१५ मध्ये कोट्यांवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल अटक केली होती. ईडीच्या तपासात त्याचे बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसबरोबर संबंध असल्याचे उघड झाले. सुकेशने जॅकलीनला तो डेट करीत असल्याचा दावा केला होता. त्याच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर जॅकलीनबरोबरचे त्याचे काही फोटो पाहायला मिळाले होते. मात्र, जॅकलीनने हे दावे नाकारले होते. त्याबरोबरच सुकेशने तिला त्रास दिल्याचेही अभिनेत्रीने म्हटले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukesh chandrashekhar gifts jacqueline fernandez private jet wrote letter from mandoli jail nsp