सनी देओलचा लेक करण देओलचा विवाहसोहळा १८ जूनला मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नामध्ये देओल कुटुंबियांनी अगदी धमाल-मस्ती केली. तर अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही करणच्या लग्नाला हजेरी लावली होती. अजूनही या शाही विवासोहळ्याच्या चर्चा काही संपत नाहीत. करणच्या लग्नापूर्वीच्या विधींचे तसेच लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातीलच काही फोटोंची सध्या चर्चा रंगताना दिसत आहे.

देओल कुटुंबियांचे बरेच फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नातवाच्या लग्नात धर्मेंद्र यांनी तर मनसोक्त एण्जॉय केलं. त्यांनी धमाल डान्स केला. इतकं नव्हे तर या लग्नामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौरही होत्या. धर्मेंद्र व प्रकाश कौर यांचे एकत्रित फोटोही समोर आले.

आणखी वाचा – Lust Stories 2 Trailer : इंटिमेट सीन्स, बोल्ड संवाद अन्…; ‘लस्ट स्टोरी २’चा ट्रेलर पाहिलात का? नीना गुप्ता यांच्या डायलॉगची जोरदार चर्चा

करणच्या लग्नानिमित्त सनीची पत्नी पूजा देओलही कॅमेऱ्यासमोर आली. इतर सेलिब्रिटींच्या पत्नी प्रकाशझोतात असतात. मात्र सनीची पत्नी लाइमलाइट पासून दूर असते. करणच्या लग्नानिमित्त सनी व पूजाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या फोटोंवरुन पूजा देओलबाबत नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहे.

आणखी वाचा – “रिक्षावाल्याने मला शिवीगाळ केली”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने भररस्त्यात त्यालाच घडवली अद्दल, म्हणाल्या, “रिक्षा पलटी केली आणि…”

पूजा फोटोंमध्ये हसताना दिसत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मुलाचं लग्न असून चेहऱ्यावर हसू नाही, सनी देओलची पत्नी टेन्शनमध्ये का आहे?, ती निराश का वाटत आहे? पूजा देओल खूश दिसत नाही अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.