बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. सुश्मिताच्या हृदयविकाराच्या बातमीने सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. सुश्मिताच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर सुश्मिताने इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता आता पुन्हा शारीरिक स्वास्थाकडे लक्ष देताना दिसत आहे. यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी सुश्मिताने व्यायामाचा आधार घेतला आगे. तिने व्यायाम करतानाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. होळीच्या निमित्ताने हा फोटो सुश्मिताने शेअर केला आहे. “मी यातून बरे झाले आहे. हृदयरोगतज्ञांच्या परवानगीने आता मी स्ट्रेचिंग करायला सुरुवात केली आहे. माझी होळी अशाप्रकारे आनंदात साजरी झाली. तुम्ही होळी कशी सेलिब्रेट केली?”, असं कॅप्शन सुश्मिताने पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा>> Video: “नवऱ्याचं निधन होऊन…” होळी साजरी केल्यामुळे मंदिरा बेदी ट्रोल

सुश्मिताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता यातून हळूहळू बरी होत असल्याने चाहतेही आनंदी आहेत. वयाची ४५शी ओलांडलेली सुश्मिता तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. सुश्मिताने हृदयविकाराच्या झटक्यानंतर केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमधूनही व्यायामाचं महत्त्व पटवून दिलं होतं.

हेही वाचा>> नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढलेल्या प्रकरणावर उर्फी जावेदचं भाष्य, म्हणाली “माझ्याबरोबरही…”

मिस युनिव्हर्सला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चाहत्यांना तिच्या प्रकृतीबद्दल काळजी वाटत होती. सेलिब्रिटींनीही सुश्मिताच्या पोस्टवर कमेंट करत चिंता व्यक्त केली होती.सुश्मिता लवकरच बरी होऊन ‘आर्या ३’ या वेब सीरिजच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात करणार असल्याचं तिने सांगितलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen exercise on wheel after suffered from heart attack kak