हृतिकचा ‘विक्रम वेधा’ पाहिल्यावर गर्लफ्रेंड आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या...|suzanne khan saba azad reactions on hrithik roshans Vikram vedha released | Loksatta

हृतिकचा ‘विक्रम वेधा’ पाहिल्यावर गर्लफ्रेंड आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या…

सुझान खान आणि गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत.

हृतिकचा ‘विक्रम वेधा’ पाहिल्यावर गर्लफ्रेंड आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या…
(फोटो – संग्रहीत)

अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतिक्षीत ‘विक्रम वेधा’ चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. २०१७ साली आलेल्या दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षाही चांगला असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत. दरम्यान, या बहुचर्चित सिनेमातील मुख्य अभिनेता हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत.

Vikram Vedha Movie Review : रिमेक असूनही उत्तम अभिनयाची जोड असलेला ‘विक्रम वेधा’

सुझान खानने हा चित्रपट तिचा आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आवडता चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “रा रा रा रा रूम, हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे!!! हा अतिशय रंजक आणि साहसी चित्रपट आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खान आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.”

सबा आझादने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये चित्रपटाचा टीझर शेअर केलाय. ‘विक्रम वेधा चित्रपट रिलीज झालाय. तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो पाहू शकता.’ याबरोबरच तिने चित्रपटाचे तिकीट बुक करण्यासाठी लिंक देखील शेअर केली आहे.

(सबा आझादने शेअर केलेली स्टोरी- फोटो इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉट)

दरम्यान, हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांनी चित्रपटाबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस. शशिकांत आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंट यांनी निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘विक्रम वेधा’बाबत केआरकेने केलेलं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “हृतिकने अमिताभ यांची…”

संबंधित बातम्या

“अचानक ती लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन कोसळली आणि…” अजय देवगणने सांगितली खऱ्या आयुष्यातील घडलेली घटना
“आता मंदाकिनी हो..” ट्विंकल खन्नानं सांगितली दिग्दर्शकाच्या फर्माईशीची आठवण
शाहरुख खानच्या ‘मन्नत’बाहेर चक्क आयुष्मान खुरानासाठी गर्दी, वाचा नेमकं काय घडलं?
“मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य
रोहित शेट्टीच्या बहुचर्चित ‘सर्कस’चा टीझर प्रदर्शित; ६० च्या दशकातील कहाणी आणि कॉमेडीचा डबल डोस

व्हिडिओ

ताज्या बातम्या
NIA ची मोठी कारवाई! दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये २० ठिकाणी छापेमारी
पुणे कॉंग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?
पुणे: ‘पीएमआरडीए’कडून वर्तुळाकार रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू
“भाजपा सरकारच्या नाकाखाली त्याने सात लाख हिंदू काश्मिरी पंडितांचा…”; “काश्मीर फाइल्स अश्लील” टीकेवरुन दिग्दर्शकाचा संताप
पुणे: महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट; महामेट्रो, महापालिकेकडून आराखडा तयार