Actress Gayatri Joshi 428 Crore Luxury Apartment Inside Photos: मुंबईत घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. वरळी येथील ओबेरॉय रिअ‍ॅल्टीच्या प्रीमियम 360 वेस्ट प्रकल्पात अनेक अब्जाधीश, उद्योजक, उच्च स्तरीय अधिकारी आणि सेलिब्रिटींनी गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पात अल्ट्रा-लक्झरी 4 बीएचके आणि 5 बीएचके अपार्टमेंट आहेत. इथे शाहिद कपूर, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार यांनी फ्लॅट खरेदी केले आहेत.

शाहरुख खानच्या ‘स्वदेस’मधील अभिनेत्री गायत्री जोशीचे घरदेखील याच ठिकाणी आहे. महत्त्वाचं म्हणजे गायत्रीचे पती, अब्जाधीश विकास ओबेरॉय हे या ओबेरॉय रिअ‍ॅल्टीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. एनेस यिलमाझर या युट्यूबरने या दोन्ही टॉवर्सची एक खास झलक दाखवली आहे.

360 वेस्टमधील सोई-सुविधा

360 वेस्ट हा सी व्ह्यू असलेला प्रोजेक्ट आहे. यात प्रायव्हेट थिएटर, बॉलिंग अ‍ॅली, रॉक-क्लाइंबिंग वॉल, स्क्वॅश, बास्केटबॉल आणि क्रिकेट कोर्ट, एक अत्याधुनिक जिम, अनेक स्विमिंग पूल आणि इतर आलिशान इन-हाऊस सुविधांचा समावेश आहे. एनेस यिलमाझरने या प्रोजेक्टला भारतातील सर्वात प्रतिष्ठित इमारतींपैकी एक म्हटलं आहे.

360 West मधील स्विमिंग पूल (Pic: Enes Yilmazer/YT)

या प्रकल्पाच्या टॉवर ए मध्ये २७ निवासी मजले आहेत, प्रत्येक मजल्यावर एक अपार्टमेंट आहे, प्रत्येक मजला १६,००० चौरस फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे. टॉवर ए च्या खाली रिट्झ-कार्लटन हॉटेल आहे. दुसरीकडे, टॉवर बीमध्ये फक्त निवारी अपार्टमेंट असून त्यात ६६ मजले आहेत.

गायत्री जोशीच्या अपार्टमेंटमधील फोटो (Pic: Enes Yilmazer/YT)

घराची किंमत किती?

युट्यूबरच्या मते, या घराची किंमत तब्बल ५० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ४२८.९६ कोटी रुपये) आहे. स्क्वेअर यार्डवरील माहितीनुसार, टॉवर बी मध्ये ४ बीएचके अपार्टमेंटची (५,२३५ चौरस फूट) किंमत सुमारे ४५ कोटी रुपये आहे, तर ५ बीएचके अपार्टमेंटची (६,६५१ चौरस फूट) किंमत ५७.१७ कोटी रुपये आहे.

अपार्टमेंटमधील फोटो (Pic: Enes Yilmazer/YT)

360 वेस्टमध्ये मालमत्ता घेणारे सेलिब्रिटी

२०२४ मध्ये 360 वेस्ट प्रकल्पात अभिनेता शाहिद कपूरने सुमारे ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्याने सी व्ह्यू असलेले दोन अपार्टमेंट खरेदी केले. अभिषेक बच्चनचेही याच टॉवर्समध्ये फ्लॅट आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये, डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकल्पात १,२३८ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली.

विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती किती?

फोर्ब्सच्या मते, जून २०२५ पर्यंत विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती सुमारे ५.७ बिलियन डॉलर्स आहे. ते जगातील टॉप ८०० अब्जाधीशांपैकी एक आहेत. तर फोर्ब्सच्या २०२४ च्या भारतातील १०० श्रीमंतांच्या यादीत, ओबेरॉय ५० व्या क्रमांकावर आहेत.