बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे लग्न सध्या खूप चर्चेत आहे. स्वराने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं. त्यांच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. दोघांनी कोर्ट मॅरेज केल्यानंतर दिल्लीत पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. स्वराच्या रिसेप्शनचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये स्वरा पाकिस्तानी लूकमध्ये दिसत आहे. स्वराने तिच्या रिसेप्शनमध्ये पाकिस्तानातून आणलेला लेहेंगा घातल्याचे वृत्त समोर आले आहे. त्या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर ढसाढसा रडलेली वनिता खरात; म्हणाली, “तो गेला तेव्हा…”

दिल्लीत रिसेप्शन दिल्यानंतर स्वरा भास्करने बरेलीमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. तिथले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. स्वरा-फहादने बरेलीतील ‘द ग्रँड निर्वाणा रिसॉर्ट’मध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी स्वराच्या लूकची चांगलीच चर्चा होत आहे. स्वराने पाकिस्तानी डिझायनरचा क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. लेहेंग्यावर पाकिस्तानी एम्ब्रॉयडरी केलेली होती.

“मला मनस्ताप होतो” एमसी स्टॅनवर चिडला अब्दु रोझिक; म्हणाला, “मी त्याला फोन केल्यावर…”

स्वराने तिच्या रिसेप्शनचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करताना अभिनेत्रीने “हा लेहेंगा खूप सुंदर बनवला आहे. सीमेपलीकडून माझ्याकडे पाठवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझ्यासाठी हा सुंदर लेहेंगा बनवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार,” असं लिहिलं होतं.

स्वराची इन्स्टाग्राम स्टोरी

स्वराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मोठी नाकाची अंगठी आणि माथा पट्टी घातली होती. यासोबतच स्वराने कानात मोठे झुमके आणि गळ्यात सुंदर चोकर नेकलेस घातला होता. तिने हातात बांगडी व मोठी अंगठी घालून लूक पूर्ण केला. तर फहादने पांढरी शेरवानी आणि पांढरा आणि सोनेरी दुपट्टा असलेला सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker wore beige pakistani lehenga in reception with fahad ahmad hrc