बॉलिवूडची मिस युनिव्हर्सचा ‘किताब जिंकलेली अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या चर्चेत आहे. लवकरच सुश्मिता ‘ताली’ या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव करत आहे. ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंतच्या बायोग्राफीवर ही वेबसीरिज आधारित आहे. सुश्मिता सेन चर्चेत असते. १९ नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस असतो त्या निमित्ताने अनेक जण तिला शुभेच्छा देत आहेत.

सुश्मिता सेन आज एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. सुश्मिताचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत असते. सुश्मिताचा पूर्वाश्रमीचा प्रियकर रोहमन शॉलने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सुश्मिताचा फोटो शेअर करत ४७ आणि बदामाची स्माईली असा कॅप्शनदेखील दिला आहे. त्याच्या या पोस्टच कौतुकदेखील होत आहे.

“माझ्या वयामुळे…” बॉलिवूडमध्ये काम न मिळाल्याबद्दल सुश्मिता सेनने केला होता खुलासा

रोहमन शॉल मुलाचा नोएडाचा असून २०१४ पासून मुंबईत स्थायिक झाला आहे. रोहमन एक मॉडेल असून तो उत्तम गिटारवादकदेखील आहे. दोघांची प्रेमकहाणी इन्स्टाग्रामवरूनच सुरु झाली होती. इन्स्टाग्रामवर रोहमनने सुश्मिताला मेसेज केला होता आणि इथून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरवात झाली होती. मात्र सुश्मिताने नंतर आम्ही वेगळे झालो आहोत हे पोस्ट शेअर करत सांगितले होते.

नुकतेच तिचे ललित मोदीशी असलेले प्रेमप्रकरण चर्चेत आले होते. सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेबसीरिजचा पहिला सीजन २०२० साली प्रदर्शित झाला होता. शोचे दोन सीझन प्रसारित झाले आहेत आणि तिसरा प्रोडक्शन चालू आहे. यातील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. सुश्मिता शेवटची २०१० साली ‘दुल्हा मिल गया’ चित्रपटात शेवटची दिसली होती.