पॅन-इंडिया स्टार म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया ! ‘जी करदा’ आणि लस्ट स्टोरीज २ मधल्या तिच्या अभिनयामुळे ती पुन्हा चर्चेत आली. हीच तमन्ना आता जॉन अब्राहमसह स्क्रिन शेअर करणार आहे. वेदा या सिनेमात तमन्ना आणि जॉनची जोडी दिसणार आहे. हा सिनेमा निखिल अडवाणी घेऊन येतो आहे. जॉन आणि तमन्नाला एकत्र पाहणं ही दोघांच्या चाहत्यांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट असणार यात काहीही शंका नाही. मनोरंजन क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही एकत्र येणार आहेत. वेदा हा सिनेमा हे दोघं करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे पण वाचा- मिटींगमध्ये ‘Lust Stories 2’ बघताना मॅनेजरला पकडलं, कर्मचाऱ्याने ‘ते’ ट्विट डिलीट केलं पण स्क्रीनशॉट Viral

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , “जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याविषयीच्या अधिक गोष्टी लवकरच समोर येतील.चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे आणि तो सात वर्षांनंतर एका दमदार कथेसह पुन्हा काम करणार आहे” तमन्ना ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. लस्ट स्टोरीज २ या सिनेमात तिने केलेल्या अभिनयाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. तसंच आता रजनीकांतसही ती एका सिनेमात झळकणार आहे. या सिनेमातलं कावला हे गाणंही युट्यूबवर फेमस झालं आहे.

हे पण वाचा- “तू पुरुषांसारखी…”; जेव्हा चालण्यावरुन तमन्नाला करण्यात आलं होतं ट्रोल, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा

जॉन आणि तमन्ना यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमात या दोघांचा अभिनय कसा असेल? या सिनेमाची कथा काय? याची उत्सुकता रंगली आहे.तमन्ना भाटिया ही आगामी ‘जेलर’, ‘भोला शंकर’ या चित्रपटांत दिसणार आहे. जॉन अब्राहम हा एक वेगळ्या धाटणीचा अभिनेता आहे. नुकत्याच आलेल्या पठाणमध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकरली होती. आता तो वेदा सिनेमात काय भूमिका साकारणार? या सिनेमाची कथा काय असणार हे पाहणं रंजक असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamannaah bhatia and john abraham to team up for this film discussion in bollywood scj