Amitabh Bachchan Jaya Bhaduri : दोन वर्षे डेट केल्यावर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी १९७३ मध्ये लग्नगाठ बांधली. जया यांचे वडील तरूण कुमार भादुरी यांच्यामते ते लग्नाआधी दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा लग्नाचा निर्णय सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता, असंही त्यांनी १९८९ मध्ये ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’साठी लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं. तसेच दोघांची जात वेगळी असल्याने त्यांचा या लग्नाला विरोध होता, या अफवाही त्यांनी फेटाळल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भादुरी यांनी लेखात अमिताभ यांच्या जिद्दीचे कौतुक केले. तसेच आपली मुलगी सामान्य माणसाच्या प्रेमात पडणार नाही, याची खात्री असल्याचं म्हटलं होतं. “अमिताभ यांनी जयाशी लग्न केलं कारण ती मोठी स्टार होती, असं खूप लोक म्हणायचे. पण हे खोटं आहे. लग्न करण्यासाठी त्यांनी जंजीर हिट होण्याची वाट पाहिली. पण तरीही जयाने त्यांच्याशी लग्न केलं असतं, याची मला खात्री आहे. ती चंचल नाही, ती घेतलेल्या निर्णयावर ठाम असते. खरं तर ते दोघे कशामुळे एकत्र आले, हे मीही सांगू शकत नाही,” असं त्यांनी लिहिलं होतं.

राज कपूर जिच्या प्रेमात होते, तिच्याच मुलीसाठी ‘या’ अभिनेत्याने राज यांच्या लेकीशी लग्न मोडलेलं; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

अचानक घेतला होता लग्नाचा निर्णय

अमिताभ यांनी जयाच्या आईला फोन करून लग्नाचा निर्णय सांगितला आणि मुंबईला बोलावून घेतलं, असं भादुरी यांनी सांगितलं होतं. “आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईत होतो, जेणेकरून ३ जून १९७३ रोजी या दोघांच्या ‘गुप्त लग्ना’ची व्यवस्था करू शकू. लग्नाची बातमी आम्ही कशी लपवून ठेवली आणि लग्न कसं झालं, यावर आता बोलायला नको. त्यांचं लग्न मलबार हिल येथे आमच्या एका मित्राच्या फ्ल्रॅटमध्ये झालं होतं,” असं भादुरी यांनी लिहिलं होतं.

रुग्णालयातील जखमी अमिताभ बच्चन यांचे ‘ते’ शब्द ऐकून ओक्साबोक्शी रडलेल्या इंदिरा गांधी; म्हणालेल्या, “बाळा…”

भटजींनी लग्न लावण्यास दिलेला नकार

लग्न घाईत ठरल्याने धार्मिक विधी करण्यासाठी बंगाली भटजी शोधताना अडचणी आल्या. जयाचे वडील नास्तिक होते, पण तिच्या आईला पारंपरिक बंगाली पद्धतीने मुलीचं लग्न करायचं होतं. “बंगाली लग्नात खूप विधी असतात. बंगाली भटजीने सर्वात आधी तर बंगाली ब्राह्मण जया आणि दुसऱ्या जातीचे अमित यांचे लग्न लावण्यास नकार दिला होता. पण त्यांना सर्वांनी कसंतरी समजावलं. नंतर सर्व विधी पार पडले. अमित यांनी कोणालाही नाराज केलं नाही, भटजींनी जे सांगितलं ते सगळं त्यांनी केलं. लग्नाचे विधी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालले आणि मग ते लंडनला गेले. ते परतल्यावर मी भोपाळला लग्नाचे रिसेप्शन ठेवले होते,” असं तरूण कुमार भादुरी यांनी सांगितलं होतं.

अमिताभ बच्चन व जया यांच्या लग्नातील काही क्षण (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

लग्नाला विरोध असण्याबद्दल काय म्हणाले होते अमिताभ बच्चन यांचे सासरे?

अमिताभ व जया यांच्या लग्नामुळे नाराज असल्याच्या अफवांबाबतही त्यांनी लेखात प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या पत्नीने किंवा मी त्यांच्या लग्नाला विरोध करण्याचे एखादे कारण तरी मला जाणून घ्यायचे आहे. अमिताभ यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खूप संघर्ष केला. सुरुवातीच्या अपयशांनी खचून न जाता त्यांनी काम करणं सुरूच ठेवलं. जंजीर हिट झाल्यावर त्यांनी जयासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मग आम्हाला काय अडचण असणार? की ते बंगाली नव्हते किंवा ब्राह्मण नव्हते? हे खूपच हास्यास्पद आहे. माझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न ब्राह्मण मुलाशी झालेलं नाही. तिचा पती एक रोमन कॅथलिक आहे. मी, माझी पत्नी, माझे वृद्ध आई-वडील सर्वजण या लग्नात सहभागी झालो होतो आणि त्यांना आशीर्वाद दिले होते,” असं तरूण कुमार भादुरी यांनी लिहिलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taroon kumar bhaduri said priest protested against daughter jaya and amitabh bachchan inter caste marriage hrc