बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पती आदिल खानचं अफेअर असल्याचा खुलासा राखीने केला होता. आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली होती. आता आदिल तुरुंगात असून रोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिल खानचं अफेअर असल्याचं उघड केल्यानंतर राखीने कॅमेऱ्यासमोरच त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं होतं. राखीने आदिलवर फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय पैसे व ज्वेलरी चोरल्याचा आरोपही राखीने केला आहे. आदिलवर म्हैसूरमध्ये एका इराणी महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होत.याबाबत त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा>> Video : “नमाज पठण करुनही…” त्याक्षणी इस्लाम धर्म स्वीकारलेल्या राखी सावंतने स्वतःच्याच कानाखाली मारली, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राखी सावंत प्रकरणावर सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने प्रतिक्रिया दिली आहे. ‘इन्स्ंटट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन उर्फीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “राखी माझी फक्त मैत्रीण नाही. ती माझ्या परिचयाची आहे. तिच्याबरोबर सगळं व्यवस्थित होऊ दे. या सर्व प्रकरणानंतर तिला थोडा आनंद व शांतता मिळावी, अशी माझी इच्छा आहे”, असं उर्फी म्हणाली.

हेही वाचा>>Video : पतीने बलात्कार केलेल्या पीडितेची राखी सावंतने घेतली भेट; पोलिसांवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाली, “आदिलचे फोन…”

दरम्यान, राखी सावंतचा पती आदिल खानला अटक केल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली होती. २० फेब्रुवारीनंतर आदिलची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सध्या त्याची म्हैसूर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed reacted on rakhi sawant husband adil khan case video kak