बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या ‘12th fail’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाला यंदाचे बरेच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. सामान्य प्रेक्षकांपासून बऱ्याच सेलिब्रिटीजपर्यंत कित्येकांनी विक्रांतच्या अभिनयाचे आणि त्याच्या या चित्रपटाचे कौतुकही केले. चित्रपटक्षेत्रात येण्याआधी विक्रांतने बऱ्याच टीव्ही सिरियल्समध्ये काम केलं ज्यातून त्याला लोकप्रियता मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विक्रांतने त्याच्या या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. ‘Unfiltered by Samdish’ या यूट्यूब पॉडकास्टमध्ये विक्रांतने हजेरी लावली अन् मनमोकळ्या गप्पा मारल्या. एक वेळ अशी होती की विक्रांत हा महिन्याला जवळपास ३५ लाख रुपये कमवायचा, पण मग काही कारणास्तव त्याने टेलिव्हिजनवरील काम बंद करून चित्रपटात येण्याचे ठरवले. यादरम्यान त्याला आलेल्या अनुभवांबद्दल विक्रांतने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “मी हिंदी चित्रपट बघतच नाही कारण…”, नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली बॉलिवूडविषयी नाराजी

विक्रांत म्हणाला, “मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून चांगलीच कमाई केली. मी माझं पहिलं घर याच कमाईतून घेतलं. परंतु एकूणच टेलिव्हिजनवरील त्याच रटाळ आणि बुरसटलेल्या विचारांच्या मालिकांना कंटाळून मे चित्रपटक्षेत्रात यायचा निर्णय घेतला. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो असलो तरी मला शांत झोप लागत नव्हती, मी फार अस्वस्थ होतो अन् त्याचवेळी मी टेलिव्हिजनमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला.”

त्याबद्दल सांगताना विक्रांत म्हणाला, “मी चित्रपटात नशीब आजमावणार असल्याचं घरी सांगितलं अन् माझ्या घरच्यांना धक्काच बसला. मी त्यावेळी चांगले पैसे कमवत होतो. महिन्याला तब्बल ३५ लाख रुपये मला टेलिव्हिजनमधून यायचे. अशा काळात मी तिथलं काम बंद केलं आणि चित्रपतक्षेत्रात यायचं ठरवलं. पुढील वर्षभरात माझ्याकडचे सेविंग सगळे संपले. माझी पत्नी शीतल तेव्हा माझी गर्लफ्रेंड होती, मी तिच्याकडून तेव्हा पैसे घ्यायचो अन् ऑडिशन द्यायचो.” विक्रांतने ‘धरम-वीर’, ‘बालिका वधू’, आणि ‘कुबुल है’सारख्या सुपरहीट मालिकांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्याने चित्रपट तसेच ओटीटी क्षेत्रातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विक्रांतच्या ‘मिर्जापुर’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ या दोन वेबसीरिजप्रचंड गाजल्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikrant massey remembers taking pocket money from his then girlfriend sheetal for audition avn