Vineet Kumar Singh on Chhaava Torture Scenes : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर हा विकीच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट सिनेमा आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, ‘छावा’मध्ये रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका केली आहे. तर विनीत कुमार सिंह कवी कलश या भूमिकेत आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. ‘छावा’मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाजारांना यातना दिल्या तेव्हाचा सीन आहे. हा सीन पाहून अनेक जण सिनेमागृहांमध्ये रडल्याचं पाहायला मिळालं. या सीनबद्दल अभिनेता विनीत कुमार सिंहने मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जशी क्रूरता झाली होती, त्या तुलनेत या सिनेमात दाखवण्यात आलेला छळ निम्माही नाही, असं विनीतने म्हटलं आहे. विनीत चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधीस्थळी गेला होता, तेव्हाचा अनुभवही त्याने सांगितला.

विनीतने शूटिंग सुरू करण्यापूर्वी स्मृतीस्थळांना दिली भेट

विनीत म्हणाला, “चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी मी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश जी यांच्या समाधीस्थळांना भेट देण्यासाठी गेलो होतो. मी अर्धा दिवस तिथे घालवता. मी त्यांच्या समाधीजवळ खूप वेळ बसलो होतो. मी तिथल्या अनेक लोकांशी बोललो. जे तिथे वर्षानुवर्षे राहत आहेत अशा काही वृद्ध लोकांशी बोललो आणि त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या.”

हेही वाचा – Chhaava: ‘छावा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, एकूण कलेक्शन किती? वाचा…

विनीत कुमार सिंह पुढे म्हणाला, “त्या काळी जी क्रूरता घडली, त्याचा फक्त एक छोटा भाग लोकांनी छावामध्ये पाहिला आहे, तोही खरंतर तेवढा हिंस्र नाही. जर तुम्ही एका महिन्यापेक्षा जास्त काळ एखाद्याचा छळ करत असाल आणि त्याचे शूटिंग करत असला तर तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला काय दिसेल?” ‘छावा’मध्ये संभाजी महाराजांना दिलेल्या यातना त्यांच्याबरोबर जे घडलं होतं त्या तुलनेत खूप सौम्य दाखवण्यात आल्या, असं विनीतने म्हटलंय.

हेही वाचा – २२ वर्षांचं करिअर, पण ‘छावा’ने मिळवून दिली ओळख; डॉक्टर असलेल्या ‘कवी कलश’ने महेश मांजरेकरांबरोबर केलंय काम

विनीत कुमार सिंह हा अभिनेता असण्याबरोबरच डॉक्टरही आहे, त्याने त्याचा अनुभव सांगितला. “मी डॉक्टर होतो, त्यामुळे मी भयानक अपघातानंतर आपत्कालीन वॉर्डमध्ये लोकांना पाहिलं आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या जखमा स्वच्छ करण्यासाठी अँटीसेप्टिक वापरायचो तेव्हा ते भयंकर ओरडतात, इतका त्रास होतो. फ्रॅक्चर झाले असेल तर त्यावर उपचार सुरू असतानाही लोक त्रासाने ओरडतात इतक्या वेदना होतात,” असं विनीत कुमार सिंह म्हणाला.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन

‘छावा’तील छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाबद्दल विनीत म्हणाला, “छावामध्ये जखमांवर मीठ चोळताना दाखवलं आहे. खरं तर अशा कथा ऐकण्यासाठी तुम्ही तिथे जाऊन लोकांना भेटू शकता. चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो. एकदा स्क्रिप्ट ऐकून होकार दिल्यावर एक अभिनेता म्हणून मी दिग्दर्शक जे म्हणले ते ऐकतो. तसेच जे काही लिहिलं आहे त्यात एका विशिष्ट प्रमाणातच मी सुधारणा करू शकतो,” असं विनीतने नमूद केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vineet kumar singh on chhaava torture scenes says it was toned down i visited chhatrapati sambhaji maharaj and kavi kalash ji shrines hrc