बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय व आदर्श कपल म्हणजे अमिताभ बच्चन व जया बच्चन. आज त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस आहे. १९७३ साली विवाहबंधनात अडकलेल्या अमिताभ व जया बच्चन यांनी ५० वर्ष सुखाने संसार केला. पण या काळात त्यांच्यावर अनेक कठीण प्रसंगांचा सामना करण्याची वेळही आली. असाच एक प्रसंग १९८२ साली घडला होता.
२ ऑगस्ट १९८२ साली कुली चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीक्वेन्स करत असताना अमिताभ बच्चन
“शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातात माझ्या आतड्यांना दुखापत झाली होती. माझ्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे मी कोमामध्ये होतो. त्यानंतर पाच दिवसांनी आम्ही मुंबईला गेलो. टाके तुटल्यामुळे पुन्हा एक सर्जरी करण्यात आली होती. तेव्हा मी १२-१४ तास बेशुद्ध होतो. माझं बीपी शून्य झालं होतं. नसांचे ठोकेही सापडत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी मला वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केलं होतं,” असं त्यांनी सांगितलं.
जया बच्चन यांनीही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर घडलेल्या या प्रसंगाचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “मी घरी माझ्या मुलांना बघायला गेले होते. रुग्णालयात परतताच माझ्या दीराने मला त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितलं. तेवढ्यात डॉक्टर आले आणि मला तुमच्या प्रार्थनाच आता मदत करू शकतात, असं म्हणाले. तेव्हा माझ्या हातात हनुमान चालीसा होती. पण, ती मी वाचू शकत नव्हते.”
हेही वाचा>> “माझ्या हातात काही नाही”, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर मिथुन चक्रवर्तींनी सोडलं मौन, म्हणाले, “केंद्र सरकार…”
“डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी इंजेक्शन देत होते. हृदय पंप करुन त्यांना पुन्हा जीवनदान देण्याचा प्रयत्न करत होते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. पण, जेव्हा डॉक्टरांनी प्रयत्न थांबवले, तेव्हा अमिताभ यांच्या हाताचा अंगठा मला हलताना दिसला. ते हालचाल करत होते आणि त्यांना पूर्नजीवन मिळालं,” असंही पुढे त्यांनी सांगितलं.
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.