सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या अभिनयाइतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. रेखा यांचं अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं रिलेशनशीप आणि त्यांचे लग्न याबद्दल खूप चर्चा होतात. रेखा यांनी अभिनेते विनोद मेहरा यांच्याशी लग्न केलं होतं. विनोद यांचं हे तिसरं लग्न होतं. पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात यांच्या नात्यात दुरावा आला होता. यामागचं कारण विनोद मेहरांच्या आई होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृणाल ठाकूरचे बिकिनीतील फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “फॉलोअर्स वाढवण्यासाठी…”

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातो की रेखा जेव्हा विनोद यांच्याशी लग्न करून सासरी पोहोचल्या तेव्हा त्या विनोद मेहरा यांच्या आईला म्हणजेच सासूला पाया पडायला गेल्या. मात्र त्यांच्या सासूला त्या अजिबात आवडायच्या नाहीत, त्यामुळे त्यांनी रेखा यांना मारायला पायातली चप्पल काढली होती, असं म्हटलं जातं. याचा उल्लेख यासीर उस्मान यांच्या ‘रेखा: अॅन अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात आहे.

शोभा यांच्याशी अफेअर असूनही हेमा मालिनींशी लग्न करण्याच्या तयारीत होते जितेंद्र; पण धर्मेंद्र पोहोचले अन्…

रेखा यांनी एका मुलाखतीत विनोद मेहरा यांच्या आईचाही उल्लेख केला होता. त्यांनी सांगितले होते, ‘माझे आणि विनोदच्या आईचे विचार जुळत नव्हते. त्या मला वाईट अभिनेत्री मानत होत्या. विनोदमुळे मी त्यांना सहन केले, पण एके दिवशी माझ्या संयमाचा बांध फुटला. जेव्हा मी विनोदला प्रेम आणि आई यापैकी एक निवडण्यास सांगितले तेव्हा त्याने आईला निवडलं. त्यानंतर आम्ही वेगळे झालो.’

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When vinod mehra mother got angry on rekha hrc