दिवंगत अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांना ट्विंकल व रिंकी नावाच्या दोन मुली आहेत. अभिनयक्षेत्र सोडून लेखिका बनलेल्या ट्विंकलबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तिने अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केलं असून त्यांना आरव व नितारा ही दोन अपत्ये आहेत. ट्विंकल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. पण, रिंकी खन्ना आता कुठे आहे व काय करते, याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सर्व मुस्लिमांना एका रंगात…”, नसीरुद्दीन शाहांची मोदी सरकारवर टीका; मुघलांचा उल्लेख करीत म्हणाले…

काही दिवसांपूर्वी ट्विंकलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने रिंकीचा उल्लेख केला होता. त्यानंतर रिंकी सध्या कुठे आहे व काय करते याबद्दलची चर्चा सुरू झाली. ट्विंकल पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी बहीण रिंकी खन्नाला फोन करते. कारण दोघींची चॉइस सारखी आहे. ट्विंकलची बहीण आणि अभिनेत्री रिंकी सध्या लाइमलाइटपासून दूर राहते आणि सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नाही.

‘कभी कभी प्यार में’ या चित्रपटातून रिंकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसली, मात्र त्यानंतरही तिची कारकीर्द बहरू शकली नाही आणि ‘चमेली’ चित्रपटानंतर तिने अभिनय सोडला. राजेश खन्ना यांची धाकटी लेक रिंकी आता चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही. ती तिचं वैवाहिक आयुष्य जगत आहे. तिने २००३ मध्ये समीर सरनशी लग्नगाठ बांधली. त्या दोघांना नाओमिका नावाची एक मुलगी आहे. ट्विंकलच्या पोस्टनुसार रिंकीला पुस्तकं वाचायला खूप आवडतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where is rajesh khanna daughter rinke khanna after quitting bollywood hrc