बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान सध्या अभिनेता अर्सलान गोनी याला डेट करत आहे. हृतिक व सुझान यांनी २००० साली लग्न केलं होतं, त्यानंतर १४ वर्षे संसार केल्यावर ते दोघेही २०१४ मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर सुझान अर्सलानला तर हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुझान खान व अर्सलान गोनी एकत्र अनेक इव्हेंट्सना हजेरी लावतात. व्हेकेशन व त्यांच्या डिनर डेट्समुळेही ते चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबरोबरचे व्हेकेशनचे रोमँटिक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अर्सलानसोबतच्या सुझानच्या नात्यावर आता तिच्या आई जरीन खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘बेबी बंप खोटा आहे’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत दिला पुरावा, खरमरीत प्रश्न विचारत म्हणाली…

सुझान खानची आई जरीन खान यांनी आपल्या मुलीच्या लव्ह लाइफबद्दल आनंद व्यक्त केला. मुलीला प्रेमात दुसरी संधी मिळाल्याचा आनंद आहे असं म्हणत त्यांनी सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलानचं कौतुक केलं. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत जरीन म्हणाल्या, “अर्सलान गोनीने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि तो जम्मूमधील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील आहे. त्याला अभिनयाची आवड आहे, त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देते. त्याचे कुटुंबीय खूप चांगले आहेत, सुझान आणि अर्सलान एकत्र खूश आहेत, हे पाहून मला आनंद होतोय.”

‘क्रिश’मध्ये हृतिक रोशनची भूमिका करणारा बालकलाकार आता ‘या’ क्षेत्रात करतोय काम, व्हिडीओ चर्चेत

लग्नाबद्दल आपलं मत मांडत जरीन खान म्हणाल्या, “या क्षणी जर तुम्हाला आज एखाद्यासोबत आनंद मिळत असेल तर तुम्ही नशीबवान आहात. भविष्यात काय दडलंय हे कोणालाच माहित नाही. तुम्ही जसं घडवता तसं तुमचं आयुष्य घडत असतं. वयानुसार आनंदी राहण्यासाठी आणि सेटल होण्यासाठी तुम्हाला लग्न करावंच लागेल ही कल्पना आता खरी राहिलेली नाही. त्यामुळे अर्सलान आणि सुझान एकत्र आनंदी आहेत आणि त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत हे पाहून मला आनंद होतो.”

फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

सुझान खान व हृतिक रोशन कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत, पण त्यांच्या दोन्ही मुलांची आई-वडील म्हणून जबाबदारी एकत्र पार पाडतात. या जोडप्याला ऱ्हेहान व हृदान रोशन ही दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांचा सांभाळ सुझान व हृतिक करतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zarine khan mother of sussanne khan reacts on relationship with arslan goni hrc