Kamali upcoming twist: मालिकेत जर नवनवीन ट्विस्ट येत असतील तर प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता असते. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली कमळी मालिका सध्या प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे.

कमळी मालिकेतील कमळी ही हुशार, सुस्वभावी, गुणी, इतरांना मदत करणारी अशी आहे. मात्र, त्रास देणाऱ्यांनादेखील ती चांगलाच धडा शिकवताना दिसते. मालिकेच्या सुरुवातीपासूनच कमळी आणि अनिका यांच्यामध्ये वैर असल्याचे पाहायला मिळते. अनिका आणि कमळी यांची भेट झाल्यापासून त्यांच्यात सतत भांडणे होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कमळी मालिकेत पुढे काय होणार?

आता कमळी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्चशिक्षण घेण्यासाठी मुंबईत आली आहे. शहरात आल्यानंतर तिला अनिकाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो आणि त्यांच्यातील भांडण सुरू राहते. या सगळ्यात अनिका कमळीविरुद्ध कट कारस्थान करत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे ऋषीने कमळीला केलेली मदत अनिकाला आवडत नाही.

आता या वैरातून कमळीचे मोठे नुकसान होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर कमळी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की परीक्षा सुरू आहे. कमळी मन लावून पेपर लिहित असल्याचे दिसत आहे.

प्रोमोमध्ये पुढे दिसते की, कमळीने काही पेपरचे तुकडे करून ते कचऱ्याच्या पेटीत टाकले आहेत. हे अनिकामुळे झाल्याचे अनिकाच्या हावभावामुळे दिसत आहे. ती म्हणते की, गावछाप तू स्वत:चा पेपर स्वत: कचरापेटीत टाकलास. त्यानंतर वर्गात शिक्षक येतात आणि ते सर्वांनी परीक्षेत मिळवलेल्या मार्क्सबद्दल बोलतात. ते म्हणतात की अगदी लाज वाटावी असे मार्क्स मिळून एकच विद्यार्थिनी नापास झाली आहे. तिचं कमळी मोहिते असं नाव आहे. हे ऐकताच अनिकाला आनंद होतो, तर कमळी आणि ऋषीला धक्का बसतो. हा प्रोमो शेअर करताना अनिकामुळे कमळी होईल का परीक्षेत नापास? अशी कॅप्शन दिली आहे.

कमळी आईचा विरोध असताना मुंबईत शिक्षण घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीसह आली आहे. मुंबईत आल्यानंतर तिला ऋषीची वेळोवेळी मदत झाली आहे. मात्र, अनिका तिच्या मैत्रिणींसह तिला सतत त्रास देताना दिसते. आता मालिकेत काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.