बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत तिच्या कोणत्या न कोणत्या कमेंटमुळे सतत चर्चेत असते. राखी सावंत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी दीपिका पदूकोणचा लोकप्रिय चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’मधला मस्तानीचा लूक परिधान केलेला असतो तर कधी भर रस्त्यात तिच्या नवीन गाण्यावर डान्स करताना दिसते.

राखी अशा काही कलाकारांपैकी आहे, जे मनात आहे ते सरळ तोंडावर बोलतात. असंच एका फॅनने तिला जेव्हा विचारले ‘तू खूप बोल्ड आहे’ तेव्हा राखीने मस्त आणि मजेशीर उत्तर दिले..

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भय्यानी’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी तिच्या सोसायटी बाहेर जात असताना एक फॅन तिला भेटते. ती फॅन तिला म्हणते “तू खूप बोल्ड आहेस” फॅनच्या वाक्यावर राखी मजेशीर उत्तर देत म्हणते “अहो ! कोणाला तरी बोल्ड होणं गरजेचं आहे….. नाहीतर समोरचा आपल्याला बोल्ड करून टाकेल”. राखीच्या या मजेशीर उत्तरावर त्या महिलेला पण हसू आवरता आले नाही.

या व्हिडिओमध्ये राखीने काळ्या रंगाचा शर्ट आणि शोर्टस परिधान केल्याचे दिसून येत आहेत. राखीच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीदेखील राखीच्या या अंदाजावर फिदा झालेले दिसत आहे. त्यांनी राखी किती “डाऊन टू अर्थ” म्हणजेच साधी आणि सरळ आहे अश्या प्रकारच्या कमेंट केल्याचे दिसून आले.

Photo-Viral Bhayani Instagram

दरम्यान ‘बिग बॉस १४’ नंतर राखी सावंतचा चाहता वर्ग आणखीन वाढला आहे. तिच्या बिनधास्त स्वभावमुळे तिचे लाखो फॅन्स आहेत.