Criminal Justice क्रिमिनल जस्टिस या लोकप्रिय वेब सीरिजच्या चौथ्या सिझनचा कदाचित शेवटचा भाग ३ जुलै रोजी प्रदर्शित होईल. यामुळे रोशनीची हत्या कशी झाली? कुणी केली? याचा उलगडा होणार आहे. दरम्यान रोशनीची हत्या कुणी केली असेल? याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. माधव मिश्रा (पंकज त्रिपाठी) हे कोडं कसं सोडवतो हे पाहणं रंजक असणार आहे.

चौथ्या सिझनची उत्सुकता शिगेला

क्रिमिनल जस्टिस सिझन 4 फॅमिली मॅटर असं या सिझनचं नाव आहे. राज नागपाल (मोहम्मद झिशान अय्यूब) हा शहरातला प्रतिथयश डॉक्टर आहे. त्याची पत्नी अंजू (सुरवीन चावला) त्याच्यापासून विभक्त झाली आहे. त्याचं रोशनी सलुजावर (आशा नेगी) प्रेम असतं. घरात एक पार्टी असते. त्या पार्टीच्या रात्री रोशनी आणि राज नागपाल यांचा वाद होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा रोशनी घरात असते आणि राज नागपाल त्याच्या घरी येतो तेव्हा रोशनीचा गळा चिरला गेल्याचं पाहतो. राज नागपाल सर्जन असल्याने तिला वाचवायचा प्रयत्न करतो पण वेळ हातातून निसटते आणि रोशनी मरते. आता रोशनीच्या हत्येच्या आरोपाखाली राज नागपालला अटक होते. त्यानंतर त्याच्या पत्नीला म्हणजेच अंजूलाही अटक होते. यानंतर मागचे सात एपिसोड ही कथा वेगळी वळणं घेत आहे. आता रोशनीची हत्या कुणी केली? याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

क्रिमिनल जस्टिस पाहणाऱ्या प्रेक्षकांची चर्चा काय?

क्रिमिनल जस्टिसचा चौथा सिझन पाहणाऱ्या अनेक चाहत्यांनी सातव्या भागानंतर लोक याबाबतची चर्चा करु लागले आहेत. ही हत्या अशा पात्राने केली असावी जे अद्याप दुर्लक्षित आहे अशी चर्चा लोक करत आहेत. राज नागपाल याने हत्या केलेली नाही तर त्याला अडकवण्यासाठी हत्या करण्यात आली आहे असंही चाहते म्हणत आहेत. काहींना वाटतं आहे की अंजूने रोशनीची हत्या केली असावी, रोशनी राजच्या मुलीला म्हणजेच इराला हळूहळू विष देत असावी आणि त्यातून हे घडलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तर काहींना वाटतं आहे की इराने म्हणजेच रोशनी जिची नर्स दाखवली आहे त्या इरानेच रोशनीला ठार केलं असावं.

वेब सीरिजमध्ये रोशनीची हत्या आणि सोशल मीडियावर अशीही चर्चा

क्रिमिनल जस्टिसच्या चौथ्या सिझनमध्ये स्कॅल्पल मिळाल्यानंतर अनेक चाहत्यांना हे वाटतं आहे की रोशनीची हत्या तिच्या ओळखीच्याच महिलेने केली असावी. अनेकांनी आता या सिझनचा ट्रेलर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. रोशनीचा गळा चिरणारे हात महिलेचे आहेत त्यामुळे रोशनीची हत्या एखाद्या महिलेनेच केल्याचं दाखवलं जाईल असंही लोक म्हणत आहेत. दर आठवड्याला एक एपिसोड आणणं चुकीचं आहे असं मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. क्रिमिनल जास्टिसचा नवा एपिसोड गुरुवरी प्रदर्शित होईल.