मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ते ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यामुळे सध्या वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता महेश मांजरेकर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मांजरेकर यांना एका अपघातात आश्रमशाळेच्या संस्था चालकाविरोधात केलेलं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकरांची गाडी दुसऱ्या गाडीवर आदळली असा आरोप केला जात आहे. महेश मांजरेकरांचा अपघात झालेला ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्था चालकाची होती. यावेळी महेश मांजरेकरांनी अरेरावी करत  संस्थाचालकांविरोधात बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे.
आणखी वाचा : “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा

याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याबरोबरच पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनांमध्ये धडक झाली होती. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ हा अपघात झाला होता. गेल्यावर्षी २०२१ मध्ये हा अपघात झाला. त्यावेळी मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांचे बदमानी करणारे वक्तव्य केले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. सातपुते यांनी मांजरेकर यांच्याविरुध्द टेभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

आणखी वाचा : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये मुलाबरोबरच महेश मांजरेकरांनी लेकीलाही दिली काम करण्याची संधी, लूक समोर

मांजरेकर यांनी सातपुते यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करून प्रतिमा मलिन केल्याची फिर्याद माढा कोर्टात दिली होती. या तक्रारीची दखल घेत न्यायाधीश गांधी यांनी टेंभुर्णी पोलिसांना मांजरेकर यांच्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director and actor mahesh manjrekar police inquiry order by pandharpur madha court nrp