Disha Patani Net Worth : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती तिचे चित्रपट किंवा ग्लॅमरस फोटो यामुळे नाही तर उत्तर प्रदेशातील बरेली येथे तिच्या घराबाहेर रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत आली आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही; परंतु या दुर्घटनेने परिसरातील लोकांना आणि तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
अभिनेत्री सध्या मुंबईत आहे; तर तिचे पालक आणि बहीण खुशबू पाटनी अजूनही बरेलीमध्ये आहेत. दिशा ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी दिशाचे ‘योद्धा’ व ‘कल्की २८९८ एडी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. दिशा १० वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि तिने अनेक मोठ्या स्टार्सबरोबर काम केले आहे. या वर्षांत दिशा पाटनीने कोट्यवधींची मालमत्ता कमावली आहे.
दिशा पाटनीची एकूण संपत्ती किती आहे?
दिशा पाटनी ही बॉलीवूडमधील सर्वांत फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे जास्त चर्चेत असते. दिशा खूप आलिशान जीवन जगते. इंडस्ट्रीच्या अहवालांनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे ९९ कोटी रुपये आहे. चित्रपट उद्योगात एका दशकाहून अधिक काळ काम केल्यामुळे तिने केवळ चित्रपटांमधूनच नव्हे, तर मॉडेलिंग असाइनमेंट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर संपत्ती कमावली आहे.
तिचा प्रवास ‘कॅडबरी’च्या जाहिरातीपासून सुरू झाला. त्यानंतर तिने अनेक जागतिक ब्रँडचे प्रतिनिधित्व केले आहे. अहवालांनुसार, ही अभिनेत्री प्रत्येक चित्रपटासाठी पाच ते सात कोटी रुपये घेते आणि बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ब्रँड जाहिरातींसाठी ती दोन ते तीन कोटी रुपये घेते, असे सांगितले जाते. मुंबईतील पाच कोटी रुपयांच्या आलिशान अपार्टमेंटव्यतिरिक्त, तिच्याकडे मिनी कूपर, ऑडी, मर्सिडीज यांसारख्या आलिशान कारदेखील आहेत.
दिशा पाटनी करिअर
१३ जून १९९२ रोजी बरेली येथे जन्मलेल्या दिशाने लखनऊच्या अॅमिटी युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले. २०१३ मध्ये पॉन्ड्स फेमिना मिस इंडिया इंदूर स्पर्धेत ती पहिली उपविजेती ठरली. २०१५ मध्ये तिने तेलुगू चित्रपट ‘लोफर’द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ (२०१६)द्वारे बॉलीवूडमध्ये यश मिळवले. तेव्हापासून तिने ‘बागी २’, ‘मलंग’, ‘भारत’, ‘राधे’ व ‘एक व्हीलन रिटर्न्स’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दिशा आता अक्षय कुमार, संजय दत्त व रवीना टंडन यांच्याबरोबर ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिसणार आहे.