बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी दिशाने राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. दिशाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर याची एक खास झलक शेअर केली आहे. यावेळी तिच्याबरोबर मौनी रॉयदेखील दिसली.

दिशाची इन्स्टाग्राम पोस्ट

दिशा पटानीने आज तिच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचे दोन खास फोटो शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोंमध्ये दिशा खूप आनंदी दिसत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त दिशाने राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यादरम्यान, तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री मौनी रॉयदेखील दिशाबरोबर दिसली. यावेळी दोन्ही मैत्रिणी राधा-कृष्णाच्या भक्तीत मग्न असल्याचे दिसून आले. दिशाने पहिल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘ब्लेस्ड मॉर्निंग’ असे लिहिले आहे आणि दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘हरे कृष्ण’ असे लिहिले आहे.

दिशा आणि मौनीचा लूक

आज दिशाने तिच्या वाढदिवसानिमित्त पारंपरिक लूक केला होता. दिशाने आज बेबी पिंक रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. दिशाबरोबर मौनी रॉयदेखील दिसली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची साडी घातली होती, ज्यावर लाल फुले आहेत. दिशा आणि मौनीचा हा लूक त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला.

दिशाच्या वाढदिवसानिमित्त मौनीने केली खास पोस्ट

दिशा पटानी आणि मौनी रॉय खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. आज दिशाच्या या खास दिवशी मौनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मौनीने इन्स्टाग्रामवर स्वतःचे आणि दिशाचे अनेक फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्या रहस्यमय, मोहक, सर्वात सुंदर लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी सर्वात चांगली मैत्रीण. देवाने तुला तुझ्या अतिविचारशील मनाला आणि मनापासून प्रेम करणाऱ्या हृदयाला हवे असलेले सर्व काही द्यावे अशी प्रार्थना.”

आता मौनीबद्दल बोलायचे झाले तर तिने पांढऱ्या रंगाची रेड फ्लोरल साडी घातली आहे, त्यावर फुले हाताने रंगवलेली आहेत, जी या लूकची खासियत बनली. लाल रंगाचा ब्लाउज आणि त्याच्या मेगा स्लीव्हजवरील फुलांचा वेल सुंदर दिसत होता. मौनी नेहमीप्रमाणे साडीत सुंदर दिसत होती.