Latest Entertainment News Today 11 May 2025: ११ मे २०२५ हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अगदी सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण आईविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात. बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या आयुष्यात मोठे बदल होतात. याविषयी बॉलीवूड अभिनेत्रींनी अनेकदा वक्तव्य केले आहे.
आलिया भट्ट एका मुलाखतीत राहाच्या जन्मानंतर तिला जितका आनंद झाला, तितकीच तिला काळजी वाटत असल्याचेदेखील म्हणाली होती. दीपिका पादुकोणने नुकतेच वक्तव्य केले होते. अभिनेत्री म्हणाली की मला स्वतःला हे सांगावेच लागते की मूल झाल्यानंतर आयुष्य संपत नाही. तुमचे पूर्वीचे जे आयुष्य होते, ते आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात करणे किंवा किमान त्याचा भाग असणे महत्वाचे आहे. पण, ज्यावेळी मी दुआबरोबर नसते, त्यावेळी मला अपराधी असल्यासारखे वाटते.
दीपिका असेही म्हणाली होती की तुम्हाला नेहमीच काहीतरी हवे असते. दुआ झोपलेली असेल तर मी व रणवीर तिच्याकडे पाहतो आणि नंतर एकमेकांकडे पाहतो. दुआ आमच्या आयुष्यात आली आहे, यावर आमचा विश्वासच बसत नाही आणि हे दर दोन दिवसांनी घडते.
अनुष्का शर्मा २०२३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली होती की आई झाल्यानंतर मला आत्मविश्वास वाटत आहे. आपल्या मुलांशी जोडले जाणे महत्वाचे असते. मुलांबरोबर असलेल्या बॉण्डिंगचा मी आनंद घेते. हे नाते खूप खास आहे.
याबरोबरच, मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Trending Keywords News Update 11 May 2025 :मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
सलमान खानने आई सलमा आणि सावत्र आई हेलनवर केला प्रेमाचा वर्षाव; नेटकरी म्हणाले…
Video: शशांक केतकरने मातृदिनी पत्नीसाठी शेअर केला खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नवरा असावा तर…”
“ती भेट मी कधीच…”, सुनील शेट्टी ‘या’ अभिनेत्याबरोबर काम करण्यास का घाबरलेला? स्वतःच सांगितले कारण
“तो मूर्ख स्त्रीसाठी…”, गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजा म्हणाली, “देव आमचं घर…”
रेश्मा शिंदेने आईला दिली देवाची उपमा; म्हणाली…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने रेश्मा शिंदेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मातृदिनानिमित्त ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने तिच्या आईबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.
सनी देओलपासून ते अनुपम खेरपर्यंत; बॉलीवूड कलाकारांनी मातृदिनानिमित्त व्यक्त केल्या भावना, म्हणाले…
जुई गडकरीच्या आईला तिच्या स्वभावातील कोणती गोष्ट खटकते? ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री म्हणाली, “माझ्यातील कोणतीही…”
“माझी हिंमतच होत नव्हती…”, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितली निळू फुलेंची आठवण; म्हणाल्या…
लंडनमधील ‘मादाम तुसा’मध्ये राम चरणचा मेणाचा पुतळा, ‘या’ गोंडस सदस्याने वेधले लक्ष; व्हिडीओ व्हायरल
“‘बाजीराव मस्तानी’ मधील ‘ती’ भूमिका हुकली कारण…”; अलका कुबल यांचा खुलासा, म्हणाल्या, “साध्या दिसण्यामुळे…”
“शेवटच्या क्षणापर्यंत आपण तिला गृहीत…”, मातृदिनानिमित्त अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा खास संदेश; म्हणाली…
Video: ‘मुरांबा’ फेम शशांक केतकरने शेअर केला आईबरोबरचा व्हिडीओ, पाहा
अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या आईबरोबर वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. तसेच त्याने त्याचे घर व घराचा परिसरदेखील दाखवला आहे.
‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने सांगितल्या आईबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीने त्याच्या आईबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
अजय देवगणच्या ‘रेड २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; १० दिवसांत केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
“देशभक्तीवर फक्त चित्रपट…”, सलमान खानने शस्त्रविरामावर शेअर केली पोस्ट; काही मिनिटांतच केली डिलीट, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
Video: मातृदिनाच्या निमित्ताने ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने सादर केली कविता
‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मातृदिनाच्या निमित्ताने एक कविता सादर केली आहे.
Video: गावात राहण्यासाठी आशाला करावी लागणार गावकऱ्यांची ‘ही’ अट पूर्ण; जालिंदरची योजना यशस्वी होणार का? पाहा प्रोमो
अमिताभ बच्चन यांच्यामुळे तुटली सलीम-जावेद यांची जोडी? जावेद अख्तर यांनी ४२ वर्षांनी सांगितले कारण, म्हणाले…
…म्हणून जुही चावलाने गुपचूप केले होते लग्न; स्वत: खुलासा करीत म्हणालेली, “त्याच्या आईने मला…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने एक फोटो शेअर करीत मातृदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
तिने तिच्या मुलाबरोबरच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते दोघेही हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना ‘जगातलं सुंदर नातं’अशी कॅप्शन दिली आहे.
‘मदर्स डे’ निमित्ताने अभिनेत्री हेमल इंगळेची आई आणि सासूबाईंसाठी खास पोस्ट; म्हणाली…
अभिनेत्री हेमल इंगळेने ‘मदर्स डे’ निमित्ताने तिच्या आई आणि सासूसाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने दोघींप्रति तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काही खास फोटोदेखील शेअर केले आहेत.
अभिनेत्री अमृता धोंगडेचा ‘एक नंबर’ गाण्यावर डान्स
अभिनेत्री अमृता धोंगडेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘एक नंबर’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे.
‘चल भावा सिटीत’मध्ये मोठा ट्विस्ट; पाहा प्रोमो
‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमात मोठा ट्विस्ट येणार आहे. स्पर्धकांना एक टास्क देण्यात येणार आहे. ज्यामध्ये श्रेयस तळपदे स्पर्धकांना काही प्रश्न विचारतो. त्याची स्पर्धकांना उत्तरे द्यायची आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.
दीपिका पादुकोण व रणवीर सिंह (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…