हॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’. हा चित्रपट भारतात सर्वाधिक पाहिला जाणार हॉलीवूड चित्रपट आहे. याचे एकूण आठ भाग रिलीज झाले असून नववा भाग ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ड्वेन जॉनसन प्रमुख भूमिका साकारतान दिसतो. मात्र डब्ल्युडब्ल्युई आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व ड्वेन जॉनसनने आपल्या चाहत्यांना एक वाईट बातमी दिली आहे. ड्वेन जॉन्सन ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’च्या पुढील सीरीज मधे दिसणार नाही.
‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’मध्ये ड्वेन जॉन्सन हॉब्सची भूमिका साकारताना दिसला आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. मात्र ड्वेन जॉन्सनने तो पुढील पर्वात काम करणार नाही अशी माहिती मुलाखतीत दिली आहे. ही बातमी ऐकताच त्याच्या फॅन्सना खूप मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून विन डीजल आणि ड्वेन जॉन्सन यांच्यात मतभेद सुरू असलेल्याची माहिती समोर आली. हे वाद एवढे विकोपाला गेले आहेत की, त्या दोघांनी एकमेकां बरोबर काम करायला ही नकार दिला असल्याचं वृत्त होतं.
एका मुलाखतीत ड्वेनने स्पष्ट केलं की “मी यावर काहीच बोलू नाही शकत, मी त्याला फास्ट अॅण्ड फ्युरियस ९ साठी शुभेच्छा देतो. फास्ट अॅण्ड फ्युरियस १० आणि ११ साठी पण त्याला शुभेच्छा देतो. कारण पुढील पर्वात मी नसेन .” ड्वेन जॉन्सन हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘द स्कॉर्पियन किंग’, ‘द रनडाउन’, ‘फास्ट अॅण्ड फ्यूरियस’ हे त्याचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत.
दरम्यान ड्वेनने ‘ब्लैक एडम’च शूटिंग पूर्ण केलं असून तो या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत एल्डिस हॉज हॉकमैनची भूमिका सकरतान दिसेल. ‘ब्लैक एडम’ 29 जुलाई 2022ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.