सध्या संपूर्ण देश करोना महामारी विरोधात लढतोय. करोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजलाय. या करोनाने कित्येक लोकांना घेरलंय तर कित्येक लोकांचा जीव घेतलाय. सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांनाच या करोनाने आपल्या जाळ्यात ओढलंय. या यादीमध्ये अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, मिलिंद सोमण सारख्या कलाकारांची नावं आहेत. सामान्य जनतेप्रमाणेच आता बॉलिवूडकरांना करोना काळात मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फुकरे’ आणि ‘ड्रीम गर्ल’ सारख्या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता मनजोत सिंह याचा भाऊ देखील करोनाच्या जाळ्यात अडकला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या भावासाठी मदत मागितली. अभिनेता मनजोतने गेल्या मंगळवारी ट्विट करत त्याच्या भावासाठी दिल्लीच्या रूग्णालयात बेडची गरज असल्याचं सांगितलं.

पण काही वेळानंतर त्याने हे ट्विट डिलीट केलं. भावासाठी बेडची गरज असल्याचं सांगितल्यानंतर त्याला मदत मिळाली आणि बेडची व्यवस्था झाली असं सांगत त्याने आधीचं ट्विट डिलीट केलंय. अभिनेता मनजोतने मदतीसाठी ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी पुढे येत त्याला मदत मिळवण्यासाठी धडपड सुरू केली होती.

अभिनेता मनजोतने त्याच्या नवीन ट्विटमध्ये लिहिलंय, “माझा भाऊ सहबजोतला रूग्णालयात बेड मिळाला आहे…मदतीसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार…आता जुनी पोस्ट डिलीट करतोय.” अभिनेता मनजोतच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याचा भाऊ बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fukrey fame manjot singh brother covid positive actor wrote on twitter my brother needs icu bed in delhi please help prp