गौहर खान आणि जैद दरबार हे कपल सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि त्यांचा प्रत्येक क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर हे जोडपं आता त्यांचा हनीमून एन्जॉय करण्यासाठी रशियाला गेले आहेत. या दोघांनीही डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं. पण करोना परिस्थितीमुळे देशात लॉकडाउनचे नियम लागू करण्यात आले होते. त्यामुळे या दोघांना त्यांच्या हनीमूनसाठी कुठे बाहेर जाता आलं नाही. आता हे दोघेही रशियात गेले आहेत. मात्र गौहरने शेअर केलेल्या या हनीमूनच्या फोटोंमध्ये पती जैद मात्र दिसला नाही.

देशात लॉकडाउनचे नियम शिथिल केल्यानंतर गौहर खान आणि तिचा पती जैन दरबार हे दोघांनी त्यांचा हनीमून प्लान केला. यासाठी ते रशियामध्ये गेले आहेत. अभिनेत्री गौहर खानने तिथे गेल्यानंतर त्यांच्या हनीमूनचे काही फोटोज शेअर केले आहेत. गौहर खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गौहरने ग्रे स्वेटर आणि ब्लॅक शॉर्ट्स परिधान केला आहे. अतिशय साध्या लुकमध्ये सुद्धा गौहर खूपच सुंदर आणि गॉर्जियस दिसून आली.

गौहर खान तिचा पती जैदसोबत रशियामध्ये रोमॅण्टिक क्षण घालवत असल्याने तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकताना दिसून आला. यावेळी ती कॅमेऱ्यासमोर आनंदात पोज देताना दिसून आली. पण तिच्या या फोटोमध्ये कुठेच पती जैद दिसून आला नाही. तिच्या या फोटोवरवर फॅन्सनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. गौहरचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये तिचा लुक तर स्टनिंग आहेच पण त्याचबरोबर फोटोंचे लोकेशन्स देखील भन्नाट आहेत.

गेल्या डिसेंबर २०२० मध्ये एका छोटेखानी समारंभात गौहर आणि जैद यांचा निकाह पार पडला. त्यानंतर गौहर जैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचा चर्चांना उधाण आले होते. पण, खुद्द गौहर हिने यावर प्रतिक्रिया देत ही गोष्ट चुकीचे असल्याचे म्हटले. गौहरने आपण जैदपेक्षा काही वर्षांनी मोठी असल्याची बाब काबुल केली. मात्र, जैदला या गोष्टीमुळे काहीच फरक पडत नसल्याचे देखील तिने म्हटले.