छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गौहरने काल सोशल मीडियावर पती झैद दरबार सोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवरून गौहरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.
गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत गौहर झैदच्या पायाशी खेळत असल्याचे दिसतं आहे. त्याचा व्हिडीओ तिने शेअर केला. तर, या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकऱ्याने “खरा इस्लाम, स्त्रियांवर नेहमीच पुरुषांचे वर्चस्व असते आणि पुरुषांच्या पायाजवळ स्त्रियांचे खरे अस्तिस्त्व असते”, अशी कमेंट कर गौहरला ट्रोल केले. ही कमेंट पाहताच गौहरने त्याला सुनावले आहे. “नाही मुर्ख माणसा, त्याला प्रेम आणि मैत्री म्हणतात. इस्लाममध्ये स्त्रीचे वर्णन पुरुषाच्या वरही नाही किंवा खालीही नाही असे केले आहे, त्या त्यांच्या बरोबरीने आहेत, जेणेकरून ती त्याच्या हृदयाच्या जवळ राहू शकते. मुर्खासारखं काहीही बोलण्याआधी गोष्टी जाणून आणि शिकूण घ्या,” असे गौहर म्हणाली.
ईदच्या निमित्ताने झैद आणि गौहरचे फोटो काढण्यासाठी काही फोटोग्राफर्स जमले होते. त्यावेळी गौहरने फोटोग्राफर्सला प्रेमाने सांगितले की कृपया फोटो काढू नका.
आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?
गौहर आणि झैद यांनी २५ डिसेंबर रोजी लग्न केले. झैद संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. तर गौहर आणि झैदमध्ये १२ वर्षांच अंतर आहे.