अभिनेता शाहरुख खान सध्या ब्रह्मास्त्रमधील त्याच्या कॅमिओमुळे चर्चेत आहे. दुसरीकडे तो त्याच्या बहुचर्चित पठाण चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. गेल्या तीन वर्षापासून त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, त्यामुळे आता त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट पाहत आहेत. बादशाहचे पठाण चित्रपटातील अनेक लूक आतापर्यंत समोर आले आहेत. नुकताच रविवारी शाहरुखने त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आंतरराष्ट्रीय डेटिंग अॅपवर माझा…” सैफ अली खानने सांगितला फसवणुकीचा किस्सा

शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या ‘पठाण’लूकमध्ये दिसत आहे. तो या फोटोमध्ये शर्टलेस बसला आहे आणि त्याचे सिक्स पॅक दाखवत आहे. शाहरुखचा हा फोटो पाहून चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्यांना शाहरुखचा हा लूक प्रचंड आवडला आहे. केवळ चाहतेच नाहीत, तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

‘ये रिश्ता…’मधील अभिनेत्रीची प्रकृती ढासळली; रुग्णालयात दाखल मैत्रिणीला भेटण्यासाठी पोहोचली तारक मेहता फेम सोनू

शाहरुख पत्नी गौरीनेही त्याच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. तिची कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे. शाहरुखने फोटो शेअर करताना मी माझ्या शर्टाशी बोलताना – ‘तुम होती तो कैसा होता….तुम इस बात पे हैरान होती…तुम इस बात पे कितनी हसती…….तुम होती तो ऐसा होता..’ मी सुद्धा पठाणची वाट पाहतोय, असं कॅप्शन दिलं होतं. त्याच्या कॅप्शनला उत्तर देणारी कमेंट गौरीने केली आहे.

देवा आता हा त्याच्या शर्टाशी पण बोलू लागला, अशी कमेंट गौरीने केली आहे.

गौरीने पती शाहरुखच्या फोटोवर केलेली कमेंट…

शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. शाहरुखबरोबर या चित्रपटात जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ‘पठाण’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauri khan comment on shahrukh khan shirtless photo hrc