राजस्थानमधील एका निर्मात्याने मला तीन महिने डांबून ठेवले होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी तेथून सुटका केली होती, असा खुलासा अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी केला आहे. नाटक, मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणा-या सुप्रिया या ठाण्यात आयोजित केलेल्या ‘महिला सुरक्षा परिसंवादा’दरम्यान त्या बोलत होत्या. मात्र, निर्मात्याचं नाव आणि घटनास्थळाबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…अन् दिलीप कुमार व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीमध्ये पडली होती फूट, नेमकं काय घडलं होतं?

सुप्रिया म्हणाल्या की, १९९५मध्ये एक निर्माता चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला आणि तिथे तीन महिने त्याने मला डांबून ठेवलं. शूटिंगसाठी मी इथून एकटी गेली होती. हे तीन महिने बंदुकीची भिती दाखवून माझ्याकडून त्याने अभिनय करवून घेतला. त्याने मला कुटुंबियांशी फोनवरून बोलण्याची परवानगी होती. पण, मराठीत बोलण्यास बंदी घातली होती. मात्र मी कशाप्रकारे तरी गुप्त भाषेचा प्रयोग करून माझ्या बहिणीला आपल्या स्थितीबद्दल सांगितलं. मग माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मदत मागितली. यानंतर राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. एक दिवस राजस्थान पोलिसांतील शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की बाळासाहेबांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. २० तासांचा प्रवास करुन मी सुखरूप सुरतला पोहोचले. याकरिता मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन, असे सुप्रिया म्हणाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Held captive by rajasthan producer rescued by bal thackeray supriya pathare