बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमुळे सातत्याने चर्चेत आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) यांचे अफेअर सुरु असल्याचेही बोललं जात आहे. अनेकदा ते दोघेही एकत्र फिरताना, डिनर डेटवर जातानाही दिसले होते. त्यानंतर ते दोघे मुंबई विमानतळावरही दिसले होते. सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होतं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये हृतिक, सबा त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान (Sussanne Khan) आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी (Arslan Goni) दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नुकतीच त्यांनी एका पार्टीत हजेरी लावली होती तिथला हा फोटो आहे.

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तिमत्त्व

विभक्त होऊनही ते दोघे एकत्र येतात हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी त्यांना ट्रोल करत म्हणाला, “त्यांच्या मुलांसाठी खूप वाईट वाटतयं, ते मोठे झाल्यावर हेच शिकणार.” दुसरा नेटकरी म्हणाला, “फक्त हेच बघायचं राहिलं होतं.” तिसरा नेटकरी म्हणाला, “हे बेशरम आहेत.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “नवीन भारताचा नवीन फोटो.”

आणखी वाचा : “मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही पण भारतातच…”, अजान, हनुमान चालीसा प्रकरणावर अनुराधा पौडवाल यांचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनि करणार आवडत्या राशीत प्रवेश, या ४ राशींवर लक्ष्मी देवी करणार धनवर्षाव

सबा आझाद नेमकी कोण?

सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. सबाला गायनासोबतच थिएटरचीही प्रचंड आवड आहे. तिने अभिनेता नसरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत ‘मॅडबॉय/मिंक’ या इलेक्ट्रॉनिक बँडचीही सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच ती ‘सोनी लिव्ह’वरील ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरीजमध्ये झळकली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan saba azad sussanne khan and arslan goni in one frame shock fans netizen troll them dcp