सध्या सगळीकडे लाउडस्पीकरवर अजान हा वाद चांगलाचं तापला आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर सोशल मीडियावरून अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्यात आता लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांनी ही या विषयावर त्यांच मतं मांडलं आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भारतात होणाऱ्या अजानची तुलना ही जगातील इतर देशाच्या अजानशी केली आहे.

अनुराधा यांनी नुकतीच ‘झी न्यूज’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत म्हणाल्या, “मी जगातील अनेक ठिकाणी फिरले. पण आपल्या भारतात जसं होतं तसं मी कुठेही घडताना पाहिलं नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र आपल्या इथे जबरदस्तीने प्रोत्साहन दिले जात आहे. मशिदीवर लाउडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांना वाटतं की आम्ही असे का करू नये.”

आणखी वाचा : “माझ्या पतीने माझ्या ओळखीच्या सर्व महिलांसोबत…”, अभिनेत्री मंदाना करीमीने केला धक्कादायक खुलासा

पुढे अनुराधा म्हणाल्या, “मी आखाती देशांमध्ये प्रवास केला आहे. पण तिथे लाउडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लीम देशात लाउडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होतं? जर देशात अजान अशीच असेल तर देशातील इतर लोकही अशा प्रकारे हनुमान चालीसा वाजवतील. यामुळे पुढे वाद निर्माण होतात, जे खूप वाईट आहे.”

आणखी वाचा : एप्रिल फूलचा विनोद पडला महागात, Video शेअर करत अंशुमन विचारेच्या पत्नीने केली ‘ही’ विनंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुराधा पौडवाल पुढे नवरात्री आणि रामनवमीवर म्हणाल्या, “आपल्या मुलांना देशाच्या संस्कृतीची जाणीव करून दिली पाहिजे. आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत हे त्यांना कळायला हवे. पोपचा संबंध ख्रिश्चन धर्माशी असल्यामुळे प्रत्येकाकडे ही माहिती असेल, म्हणूनच हिंदूंनी चार वेद, १८ पुराणे आणि चार मठ आहेत, हे आपल्या धर्माबद्दल जाणून घेतले पाहिजे.”