बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये तिची खास ओळख निर्माण केलीय. हुमाचा आज वाढदिवस आहे. दिल्लीमध्ये हुमाचा जन्म झाला होता. हुमाचे वडिल दिल्लीतील लोकप्रिय अशा सलीम्स या हॉटेल बिझनेसमध्ये आहेत. हुमाने तिचं संपूर्ण शिक्षण दिल्लीतच पूर्ण केलंय. त्यानंतर अभिनय क्षेत्रात वळण्याचा तिने निर्णय घेतला. कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हुमाने शिएटरमध्ये सहभाग घेतला.
२००८ सालामध्ये हुमा अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईमध्ये आली. त्यानंतर हुमाने अनेक ऑडिशन्स दिले. अर्थातच ऑडिशन देवून लगेचच काम मिळणं हुमासाठी देखील सोपं नव्हतं. अखेर अनेक ऑडिशन्स दिल्यानंतर हुमाला हिन्दुस्तान यूनीलिवरसाठी सिलेक्ट करण्यात आलं. कंपनीसोबतच्या करारानंतर हुमाला अनेक जाहिरातींमध्ये काम मिळालं. जाहिराती करत असतानाच एका जाहिरातीमुळे हुमाच्या आयुष्यात नवं वळणं आलं. हुमा कुरेशीला आमिर खानसोबत एका मोबाईल फोनच्या जाहिरातीमध्ये काम करण्याती संधी मिळाली. या जाहिरातीनंतर हुमाला लगेचं बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत देखील एक जाहिरात करण्याची संधी मिळाली.
हुमा कुरेशी जेव्हा आमिर खानसोबत मोबाईलच्या जाहिराचीचं शूटिंग करत होती तेव्हाच दिग्दर्शक अनुराग कश्यपची नजर हुमावर पडली. यावेळी अनुराग कश्यप आपल्याला खरचं सिनेमात काम देईल अशी हुमाला कल्पना देखील नव्हती. त्यानंतर अनुराग कश्यपने ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमालाठी हुमाला कास्ट केलं.
‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच हुमा कुरेशीच्या अभिनयाचं मोठं कौतुक झालं होतं. हुमाच्या अभिनयाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सिनेमानंतर हुमा ‘बदलापुर’, ‘जॉली एलएलबी 2′,’काला’ या सिनेमांमध्ये झळकली. यासोबतच हुमाने वेब सीरिजमधूनही चाहत्यांची मनं जिकंली आहेत.