india lockdown director madhur bhandarkar open up about siddhivinayak temple spg 93 | "सिद्धिविनायक मंदिराबद्दलची 'ती' प्रथा..." दिग्दर्शक मधुर भांडारकरांनी केला मुलाखतीत खुलासा | Loksatta

“सिद्धिविनायक मंदिराबद्दलची ‘ती’ प्रथा…” दिग्दर्शक मधुर भांडारकरांनी केला मुलाखतीत खुलासा

माझा देवावर विश्वास आहे. माझ्या आयुष्यात देवाचे खूप मोठे स्थान आहे

“सिद्धिविनायक मंदिराबद्दलची ‘ती’ प्रथा…” दिग्दर्शक मधुर भांडारकरांनी केला मुलाखतीत खुलासा
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

दिग्दर्शक मधुर भांडारकर हे नेहमीच त्यांच्या चित्रपटातून वेगवेगळे महत्वाचे विषय हाताळत असतात. आता ते त्यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातून ते करोना काळातील टाळेबंदीवर भाष्य करणार आहेत. हा चित्रपट लवकरच ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका मुलाखतीमध्ये मधुर भांडारकर यांनी सिद्धिविनायक मंदिराबद्दल सांगितले आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक प्रसिद्ध मंदिर आहे. अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. युट्यूबवरील ‘द बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात नुकतीच मधुर भांडारकर यांनी हजेरी लावली ज्यात त्यांनी हा किस्सा सांगितला आहे. “मी मंगळवारी खारवरून सिद्धिविनायकला चालत जातो. वाटेतजाताना शिवाजी पार्कात असेलल्या काली मातेचे आणि गणपतीचे दर्शन घेतो. १९९४ पासून माझी ही प्रथा सुरु आहे. कधी कधी गाडीनेदेखील जातो. मी मुंबईबाहेरून कुठून ही आलो आणि मंगळवार असेल तर मी विमानतळावरून थेट मंदिरात जातो. मंगळवारी जरी माझे विमान ११,१२ चे असले तरी मी सकाळी लवकर उठून दर्शन घेतो आणि मग विमान पकडतो. माझा शक्तींवर विश्वास आहे, माझा देवावर विश्वास आहे. माझ्या आयुष्यात देवाचे खूप मोठे स्थान आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यातून ते किती श्रद्धाळू आहेत हे दिसून येत.”

Photos : महागड्या गाड्या, कोटींचा बंगला, जाहिराती आणि बरंच काही…कोट्याधीश विजय देवरकोंडाची संपत्ती बघाच

या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल खुलासा केला. केवळ फिल्ममेकर व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून या क्षेत्रात आलेल्या मधुर यांच्या वडिलांचा व्यवसाय ठप्प झाल्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली होती. अशातच त्यांनी वेगवेगळी कामं केली. चित्रपटाची आवड असल्या कारणाने त्यांनी त्या काळात घरोघरी जाऊन व्हिडिओ कॅसेट पोहोचवायचं कामदेखील केलं.

मधुर भांडारकर यांनी ‘पेज ३’, ‘ट्राफिक सिग्नल’, ‘चाँदनी बार’, ‘फॅशन’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या आगामी ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. कोविड काळात देशातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, शिवाय या काळात सामान्य माणूस कशा रितीने भरडला गेला यावर मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाच्या मध्यमातून प्रकाश टाकला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:50 IST
Next Story
Video: “प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते” म्हणणाऱ्यांना हेमांगी कवीचं जशास तसं उत्तर, व्हिडीओ चर्चेत