शाहरुख खानला बॉलीवूडचा ‘किंग’ म्हटले जाते. शाहरुख खानची प्रत्येक गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी खास असते. शाहरुख खानप्रमाणेच त्याचे घर मन्नतदेखील खूप लोकप्रिय आहे. मन्नत खूप महाग आहे; त्याची किंमत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते.
कॉमेडियन गुरसिमरन खांबा, ज्याने जवळजवळ एक दशकापूर्वी शाहरुख खानबरोबर पॉडकास्ट शूट केला होता. त्याने शाहरुखच्या मन्नतबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. खांबाने अलीकडेच स्वतःचा पॉडकास्ट लाँच केला आहे, जिथे त्याने त्याची पत्नी, अभिनेता इस्मीत कोहली यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा केली.
काही वर्षांपूर्वी जेव्हा तो आता बंद पडलेल्या कॉमेडी कलेक्टिव्ह एआयबीचा भाग होता, तेव्हा त्याने शाहरुख खानची एक तासाची मुलाखत घेतली होती, जी आजही लोकप्रिय आहे. त्याच्या नवीन पॉडकास्टमध्ये त्याने म्हटले आहे की, सेलिब्रिटी त्यांच्या माजी सहकाऱ्यांबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारतात.
इस्मीतने त्याला दिवंगत इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव विचारला, ज्यांच्याबरोबर त्याने कधीही प्रदर्शित न झालेल्या प्राइम व्हिडीओ शो ‘गोरमिंट’मध्ये काम केले होते. तो म्हणाला की, त्याने शाहरुख खानचा पॉडकास्ट त्याच वेळी शूट केला, जेव्हा तो नियमितपणे इरफान यांच्या घरी जात होता.
खांबा मन्नतबद्दल म्हणाला, “आम्ही जेव्हा मन्नतला गेलो होतो, तेव्हा तिथे जवळजवळ २४ तास सुरू राहणारे स्वयंपाकघर होते आणि तिथे एक ट्रे असतो, ज्यामध्ये पेये आणि अन्न भरलेले असते. तिथे सगळं काही आहे आणि तुम्ही फक्त खात राहा. शाहरुखबद्दल मी दोन गोष्टी सांगेन: एक म्हणजे जेव्हा त्याच्या ग्रंथालयांमध्ये एखादे पुस्तक असते तेव्हा तुम्हाला कळते की त्याने ते वाचले आहे, इतर अनेक अभिनेते बुद्धिमान दिसण्यासाठी पुस्तके ठेवतात. माझ्यावर विश्वास ठेवा, मी यापैकी बहुतेक लोकांना ओळखतो आणि कोणीही या ग्रंथालयांमध्ये पाऊल ठेवत नाही. दुसरे म्हणजे, जेव्हा आम्ही शाहरुख सरांच्या घरी जायचो, तेव्हा तिथे सतत नाश्ता असतो.
गुरसिमरन खांबा पुढे म्हणाला, “त्या काळात मी इरफान सरांच्या घरीही जात असे आणि ते काही काजू आणि लिंबू पाणी द्यायचे. एके दिवशी मी त्यांची मस्करी केली. मी म्हणालो, सर, आम्ही शाहरुख सरांच्या घरी गेलो होतो, तो चविष्ट नाश्ता वगैरे देतो.” खांबा म्हणाला की, इरफान लगेच त्याला म्हणाले तुला काय खायला आवडेल.