नुकताच ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट दिवस’ साजरा केला गेला आणि प्रेक्षकांनी याला उदंड प्रतिसाद दिला. तिकीट दर कमी झाल्याने लोकांनी तिकीटबारीवर गर्दी केली. बॉलिवूडच्या त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘चूप’ या चित्रपटाला याचा चांगलाच फायदा झाला. याच दिवशी या वर्षातले काही गाजलेले चित्रपट पुन्हा लावायचा निर्णय चित्रपटगृहांच्या मालकांनी घेतला आणि १३ वर्षांपूर्वी आलेला जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित ‘अवतार’ पुन्हा प्रदर्शित केला गेला. यालाही लोकांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दिवसाच्या निमित्ताने अवतार पुन्हा ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. तब्बल १३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित केलेल्या अवतारनेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या ३ दिवसांत जगभरात ‘अवतार’ने २४४ कोटी इतकी कमाई केल्याचं समोर आलं आहे. नवरात्र आणि जागतिक चित्रपट दिवस यानिमित्ताने भारतात तिकीट दर कमी ठेवले आहेत. त्यामुळे प्रेक्षक बॉक्स ऑफिसवर गर्दी करताना दिसत आहेत,

आणखी वाचा : अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हिंदी चित्रपटांच्या सद्यस्थितीवर केलं भाष्य; म्हणाले, “मला कायम चिंता…”

२००९ साली आलेल्या अवतारने सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून रेकॉर्ड केला होता. तो रेकॉर्ड थेट १० वर्षांनी ‘Avengers Endgame’ या चित्रपटाने मोडला होता. जेम्स कॅमेरॉन यांनी त्यावेळी वापरलेलं तंत्रज्ञान तेव्हा आपल्याकडे उपलब्धही नव्हतं असंही म्हंटलं जातं. अवतार हा चित्रपट वेगळा आणि महागडा जरी वाटत असला तरी याची कथा प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली होती. म्हणूनच आजही या चित्रपटासाठी लोकांनी एवढी गर्दी केली होती.

याच अवतारचा दूसरा भाग यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या भागाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाला आहे ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या दुसऱ्या भागात आता कहाणीमध्ये नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रत्येक चित्रपटप्रेमीला आहे. अवतारच्या पहिल्या भागाप्रमाणेच हा दूसरा भागही इतिहास रचणार की नाही हे १६ डिसेंबर नंतरच कळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: James camerons avatar rereleased first part collection is half of brahmastra entire collection avn
First published on: 26-09-2022 at 18:00 IST