jaya bhattacharya opened up about her life struggle : चित्रपटसृष्टीत प्रत्येक अभिनेत्री स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असते. काहींना यश मिळतं; तर काही मात्र प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या प्रतीक्षेत असतात.

‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’मध्ये पायलची भूमिका साकारून अभिनेत्री जया भट्टाचार्य प्रसिद्ध झाली. पायलच्या भूमिकेने तिने लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. या मालिकेतील तिची नकारात्मक भूमिका खूप आवडली. जया नकारात्मक भूमिकेत इतकी लोकप्रिय होती की, या मालिकेनंतर तिला फक्त नकारात्मक भूमिकाच मिळू लागल्या.

जया भट्टाचार्य ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत तिने बरेच काही उघड केले आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती फक्त १७-१८ वर्षांची होती तेव्हा एक काका तिच्या घरी यायचे. त्यांनी तिला गाडी चालवायला शिकवले.

त्या माणसाबद्दल बातम्या येऊ लागल्या की, तो खूप धोकादायक आहे. त्याचे राजकीय संबंध आहेत आणि तो माफियांशीही जोडलेला आहे, असे म्हटले जात होते. त्या माणसाने जयाला सांगितले की, तू माझ्याबरोबर मुंबईत ये; मी तुला माधुरी दीक्षित बनवीन. अभिनेत्रीने नकार दिला.

त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, “मी जिथे जायचे, तिथे तो माणूस माझ्या मागे यायचा. असंच एके दिवशी त्या माणसानं माझ्या आई-वडिलांना सांगितलं की, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. मी झोपले असताना हे सगळं ऐकलं होतं. आम्हाला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. मग आम्ही दूरदर्शनच्या ऑफिसमध्ये गेलो, त्याचे मित्र तिथे होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की, तो माणूस विवाहित आहे आणि त्याला मुलंही होती. मग आम्ही त्याचा पत्ता घेतला आणि त्याच्या घरी गेलो. त्यानंतर मग त्यानं आमच्या घरी येणं बंद केलं.”

अभिनेत्रीने म्हणाली की, तो माणूस काही दिवसांनंतर पुन्हा आमच्या घरी येऊ लागला. तो एका दिवशी मला घरापासून काही अंतरावर असलेल्या स्टेशनवर सोडण्यासाठी आला. मी त्यांना त्यांचं विचित्र वागणं पाहून विचारलं की, तुम्हाला नक्की काय हवंय? तर तो म्हणाला की, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. साधारण ती १९९१-९२ सालची ही गोष्ट आहे. तो माणूस एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं मला लग्नासाठी चक्क दोन लाख रुपये हुंडा देईन, असं तो म्हणाला. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, मी विकली जाणारी नाही. मी स्पष्टपणे त्याला बजावून सांगितलं की, तू आमच्या घरी यापुढे यायचं नाही.”

याचदरम्यान, मला इंडस्ट्रीत तीन लोकांनी त्रास दिला होता; पण रहीमजींमुळे ते काही करू शकले नाहीत. त्यापैकी एका मोठ्या दिग्दर्शकानं मला त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवायला सांगितले होते.” त्या मजहिर रहीमबरोबर बरीच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या, असंही अभिनेत्रीने सांगितलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

बऱ्याच दिवसांनी त्या माणसानं पुन्हा फोन केला आणि म्हणाला की, माझी बायको जळून मेली. चला आता भेटूया. अभिनेत्री म्हणाली की, मी ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’मध्ये सात वर्षे कोणत्याही वचनबद्धतेशिवाय काम केलं. एकदा मी मागितल्यावर माझा पगार १००० रुपयांनी वाढला. तिथे मला आदर मिळाला नाही. जया ११ वर्षांपासून माझिर रहीमबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. त्याला लग्न करायचे होते; पण अभिनेत्रीला तिचं करिअर बनवायचं होतं आणि तिच्या पालकांची काळजी घ्यायची होती.