बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनया नंतर आता बेबो एक लेखक म्हणून समोर आली आहे. करीनाचं लवकरच ‘प्रेग्नेन्सी बायबल’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. काही दिवसांपूर्वी करीनाने तिच्या या आगामी पुस्तकाची घोषणा केली होती. या पुस्तकात करीनाने जेव्हा तिने तैमूरला जन्म दिला त्यावेळी ती एक परिपूर्ण आई नव्हती असे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करीना आणि सैफला दोन मुलं आहेत. मोठा मुलगा तैमूर असून त्याचा जन्म हा २०१६ मध्ये झाला होता. ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात तैमूरच्या जन्माविषयी बोलताना करीना म्हणाली की सुरुवातीला आईच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तिला अनेक अडचणी आल्या.

“सुरुवातीला मी एक परिपूर्ण आई नव्हते. पण, त्याची एक मजा देखील आहे. सुरुवातीला मला तैमूरची शी कशी साफ करावी किंवा त्याचे डायपर कसे काढायचे ते माहित नव्हते. बर्‍याच वेळा त्याची शी बाहेर यायची कारण मी त्याला डायपर व्यवस्थीत घालू शकत नव्हते. पण, माझा इथे एक सल्ला द्यायचा आहे,” असे करीना म्हणाली.

आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

पुढे करीना म्हणाली, “हे तुमच्या सोयीसाठी आहे. जे तुम्हाला सोईसकर वाटेल ते करा. जेव्हा आईला स्वत:वर विश्वास असतो तेव्हा मुलांनाही ते जाणवते. म्हणूनच मी इतक्या लवकर कामावर परतले. करीना पुढे म्हणाली की तिला माहित होते की फक्त एक आई असणं ही तिची ओळख नाही. त्यामुळेच गरोदर असताना देखील ती काम करत होती आणि आता प्रसूतीनंतर देखील ती लवकरच कामावर येणार आहे.”

आणखी वाचा : ‘या’ अभिनेत्रीने लग्नासाठी केलं होतं धर्मपरिवर्तन

करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीना आमिर खानसोबत दिसणार आहे. सध्या आमिर लडाखमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena kapoor khan talks about her initial days as a mother says she did not know how to clean taimur poop dcp