बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते व लाडके कपल म्हणजे अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करीना सैफसोबत भांडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ‘मला मुर्ख समजतोस का?’ असे करीना सैफला बोलताना दिसत आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे एक जाहिरात आहे. या व्हिडीओमध्ये करीनाने काळ्या रंगाचा टॉप, स्कर्ट आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे. तिचा हा लूक ‘जब वी मेट’ चित्रपटातील असल्यासारखा वाटत आहे. व्हिडीओमध्ये ती एका दुकानात शिरते आणि दुकानदाराला म्हणजे सैफ अली खानला बोलते, ‘मुर्ख समजतोस का मला? मी एमए केले आहे इंग्रजीमध्ये.’ त्यांचा या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Video: एअरपोर्टवर असं काय घडलं की चाहते श्रेयस तळपदेला म्हणाले, ‘फायर है भाई तू’

करीना आणि सैफला एकत्र पाहणे चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. करीनाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर रणवीर सिंहने कमेंट केली आहे. ‘हाहाहाहाहा… लव्ह इट’ असे त्याने कमेंट करत म्हटले आहे. तर काहींनी ‘गीताची आठवण आली’ अशी कमेंट केली आहे.

२०१२ मध्ये करीना आणि सैफ अली खानने एजंट विनोद चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर ते एकत्र दिसले नव्हते. आता त्यांनी या जाहिरातीमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची ही जाहिरात सध्या चर्चेत आहे.