scorecardresearch

Video: एअरपोर्टवर असं काय घडलं की चाहते श्रेयस तळपदेला म्हणाले, ‘फायर है भाई तू’

श्रेयस तळपदेचा एअरपोर्टवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

(PHOTO CREDIT : VIRAL BHAIYANI VIDEO)

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची अनोखी स्टाइल, त्याचा डान्स, डायलॉग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. आता श्रेयसचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रेयस तळपदेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टवरील आहे. व्हिडीओमध्ये श्रेयस तळपदे पुष्पाचा लोकप्रिय ठरलेला डायलॉग ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है मै’ बोलताना दिसत आहे. तो डायलॉग ऐकून फोटोग्राफर देखील श्रेयसची वाह वाह करत असल्याचे ऐकू येत आहे.
Video: ‘पुष्पा’ गाण्यावरील वॉर्नरचा डान्स पाहून अल्लू अर्जुन म्हणाला…

दरम्यान, श्रेयसने राखाडी रंगाचा टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. सध्या श्रेयसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘तुझे काम अप्रतिम आहे.. फायर है भाई तू’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘पुष्मामधील डायलॉग खूप मस्त आहेत’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने कमेंटमध्ये हार्ट इमोजी वापरले आहेत.

‘पुष्पा : द राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shreya talpade pushpa famous dialogue user loved it and reacted on it watch video avb

ताज्या बातम्या