अभिनेता कार्तिक आर्यन ज्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. किआरा अडवाणीसोबत भूलभुलैया २ मध्ये शेवटचा दिसला होता. आता त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतीच त्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची भेट घेतली असल्याने सोशल मीडियावर चर्चाना उधाण आले आहे. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने चर्चेत आलेले विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिक आर्यन सोबतच्या भेटीचा त्यांनी फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन असा दिला आहे की, ‘छोटं शहर, दोन मध्यमवर्गीय, ग्वालियासारख्या शहरातून आलेल्या आपल्या सारख्या सिनेसृष्टीतील बाहेरच्या लोकांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे’. पोस्टमधून त्यांनी बॉलिवूडला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ते पुढे लिहतात ‘जर तुम्ही तरुण भारतीय असाल तर कार्तिकचा आदर्श ठेवा कारण तो अत्यंत प्रतिभावान आणि एकनिष्ठ आहे’. चाहत्यांनी या पोस्टवर कंमेंट्स वर्षाव केला आहे. आम्ही पडद्यावर काहीतरी मोठे अपेक्षित करत आहोत चाहत्यांनी अशा कंमेंट्स केल्या आहेत.

एकनाथ शिंदे नव्हे तर ‘या’ राजकीय व्यक्तीच्या सल्ल्याने धर्मवीर चित्रपटाची कल्पना सुचली, निर्मात्यांचा खुलासा

कार्तिक आर्यन रोहित धवनच्या शेहजादामध्ये अभिनेत्री क्रिती सेननसोबत दिसणार आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. साजिद नाडियाडवाला यांच्या ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटात पुन्हा एकदा किराया अडवाणी सोबत दिसणार आहे. तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटाची तयारी करत आहेत.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘काश्मीर फाईल्स’ जो टाळेबंदीनंतर सर्वात जास्त चाललेला चित्रपट आहे. १९९० च्या दशकात काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या पलायनावर हा चित्रपट आधारित आहे. काश्मीर फाईल्स आधी त्यांचा ‘ताशकंद फाईल्स’ चित्रपट आला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmir files director vivek agnihotri shared photo with kartik aryan on instagram spg