‘बिग बॉस’ फेम अभिनेता अभिनव शुक्ला सध्या बराच चर्चेत आहे. तो लवकरच स्टंट बेस रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमात टीव्ही क्षेत्रातील नामवंत कलाकार कठिण स्टंटस् परफॉर्म करतात. या शोचं चित्रीकरण अफ्रिकेतील ‘केपटाऊन’ या शहरात झाले आहे.

‘खतरों के खिलाडी ११’चे प्रोमो सध्या बरेच चर्चेत असून प्रेक्षकांमध्ये शो संबंधीत उत्सुकता वाढलेली दिसत आहे. कलर्सने नुकताच एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनव शुक्लाला ‘ज्ञानी बाबा’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रोमोमध्ये तो एक ‘एरियल स्टंट’ परफॉर्म करताना दिसत आहे. हा स्टंट परफॉर्म करत असताना, तो ज्या फळीवर स्टंट परफॉर्म करत असतो ती फळी हालत असते.

अभिनवचा स्टंट परफॉर्म करून झाल्यावर रोहित शेट्टी त्याला विचारतो की काय झालं तेव्हा अभिनव सांगतो, “तळाशी जी फळी आहे ती हलत आहे. मी विज्ञानातच्या वर्गात शिकलो आहे की दोन कंपन होणाऱ्या वस्तूंमधून प्रतिनाद निर्माण होतो आणि हे खूप त्रासदायक असतं.” अभिनवचं हे ज्ञान पाहून रोहित शेट्टी चक्क जमिनीवरच आडवा झाला. रोहित अभिनवला म्हणाला, “आत्ता कळलं की बिग बॉसमध्ये सलमान सारखा जमिनीवर आडवा का व्हायचा”. एवढचं नाही तर अभिनवचं गहे उत्तर ऐकून शोमधील इतर स्पर्धकांनी देखील कपाळाला हात लावला.

दरम्यान या शोचे चित्रीकारण संपले असून शो १७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनव शुक्ला बरोबरच अनुष्का सेन, राहुल वैद्य, वरुण सुद, विशाल आदित्य सिंग, सना मकबुल, सौरभ राज जैन,आस्था गिल, महक चहल, दिव्यांका त्रिपाठी, देखील स्टंट करताना दिसतील.